Tuesday, August 3, 2010

ऑनर किलिंग :शेतीतून उपजणारी क्रूरता ?

ऑनर किलिंग -सन्मान राखन्यासाठी हत्या- या गोंडस नावाखाली सुरु असलेल्या
क्रूर आणि रानटी हत्त्यांचा इतिहास जुना आहे.मोगलांच्या कालात शहजादा सलीम वर प्रेम केले म्हणून अनारकलीच्या बाबतीत जे घडले त्या पेक्षाही या हत्त्याना जुना इतिहास आहे.नंतरच्या कालखंडात जग अनेक अर्थाने आणि अनेक अंगाने बदलले तरी अशा हत्या थांबल्या नाहीत.हत्या त्याच फ़क्त त्यासाठी वापरल्या जाणारा शब्द नवा! ऑनर किलिंग शब्द नवा म्हणजे एक दशका पुर्वीचा.पतीच्या अत्त्याचाराने त्रस्त एका महिलेने घटस्फोट मागितला म्हणून भर दिवसा
तिच्या घरच्यानी तिच्या वकिलाच्या चेंबरमधे तिची हत्या केली । कुटुम्बाला लाज आणनारी तिची कृती
असल्याने हत्या करने भाग पडले असा तिच्या कुटुम्बियानी दावा केला आणि पुराणमत वाद्यानी ,धर्म मार्तंडानी
या कृतीचा गौरव केला.प्रसिद्धी माध्यमानी ऑनर किलिंग म्हणून या घटनेचे वर्णन केले.तेव्हा पासून ऑनर किलिंग असे सन्मान जनक नाव अशा प्रकारच्या क्रूर हत्त्याना दिले जात आहे.वर्णन केलेली घटना पाकिस्तानातील असली तरी तीसरे जग (सर्व प्रकारच्या मागासलेपणाने समृद्ध असलेल्या देशांसाठी वापरण्यात येणारा हां आणखी एक सन्मान जनक शब्द!)अशा घटनासाठी (कु)प्रसिद्ध आहे.पाकिस्तानला सर्वच क्षेत्रात
पछाड़न्यासाठी पछाडलेला आमचा देश या बाबतीत मागे कसा राहील?आमच्या प्रसिद्धी माध्यमानी तर ऑनर किलिंग या शब्दाला मानाचे स्थान देण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. अतिशय कृरतेने केलेल्या
हत्त्यांचे उदात्तीकरण करीत आहोत याचेही भान प्रसिद्धी माध्यमानी राखले नाही.पण हां निव्वळ बेभानपणा नाही.
कुटुम्बाचे नाक कापले गेले म्हणून ह्त्या करावी लागली या ह्त्या करनारान्च्या भावनेशी समाज आणि प्रसिद्धी माध्यमे सहमत असल्यानेच हां शब्द वापरल्या जातो हे त्या मागचे खरे कारण आहे.या अर्थाने ऑनर किलिंग या सदरात मोडनारी प्रत्येक हत्या ही समाज मान्य हत्या आहे। म्हनुनच या पुढे या लेखात मी ऑनर किलिंगला समाज हत्या असे सम्बोधनार आहे।
या समाज हत्या बाबतची छुपी संमती किंवा छुपी सहानुभूती या हत्त्यांबाबत परखड विश्लेषण करून कठोर उपाय योजना करण्याच्या मार्गातील मोठा अडसर ठरत आहे.सध्या चर्चेत असलेल्या समाज हत्या या भिन्न जाती-धर्माच्या मूल-मुलीनी कुटुम्बाच्या किंवा समाजाच्या विरोधाला न जुमानता लग्न केल्याने झालेल्या आहेत.अशा हत्त्यांच समर्थन करणारे देत असलेले भावनिक तर्क तकलादुच नव्हे तर खोटे असतानाही माध्यमा मधून आणि विचारवन्ताच्या चर्चासत्रात त्यावर काथ्याकुट सुरु असतो। मुलगी सद्यान नसताना एखाद्या मूल बरोबर पलुन जान्यावर त्यांचा आक्षेप तर्कसंगत वाटत असला तरी त्यावर त्यांचा मनापासून आक्षेप आहे असे मानने म्हणजे स्वत:ची फसवणुक
करून घेणे आहे। यासाठी पोलिसात तक्रार करण्याचा कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना हत्ये सारखे टोकाचे
पाउल कोणताही सुजान माणूस उचलणार नाही। उलट असा आक्षेप घेणारेच कायदा धाब्यावर बसवून कमी वयात
मुलीचे लग्न लावून देण्यात पुढे असतात। ही मंडली सालसुदपणाचा आव आणून एका गावात राहणारे सारे मुले-मुली भाऊ-बहिणी असतात आणि भाऊ- बहिणीचा विवाह कसा मान्य करायचा असा सवाल करतात.पण
कायद्यानेच रक्ताचे भाऊ-बहिण असणारे विवाह करू शकत नाहीत। पण गाव भाऊ किंवा गाव बहिणीचे म्हणाल तर यात गावातील दलित समाजाच्या मुला-मुलींचा समावेश ते करतात काय हे तपासून पाहिले म्हणजे त्यांचा
मानभावीपणा उघड झाल्या शिवाय राहणार नाही. त्याही पेक्षा त्यांचा आमच्या चाली रिती व परम्परा रुजविन्याची ,टिकाविन्याची व पुढे चालविन्याची जबाबदारी जात पंचायतीची आहे आणि त्यात सरकार सह अन्य कोणाला हस्तक्षेप करता येणार नाही ही भूमिका कायदा आणि संविधान यांच्या चिंधड्या उड़विनारी आहे.दुर्दैवाने
सरकार पेक्षा समाज श्रेष्ठ अशी तत्वश: भूमिका घेणारे जात पंचायतीच्या अधिकाराचे समर्थन करतात.जात आणि समाज एक समजण्याची गल्लत ते करतात.आपल्या देशात संविधान लागू होवून ६० वर्ष उलटून गेली असली तरी संविधान सर्वोपरि आहे ही भावना जन माणसात रुजविन्यात आम्ही सपशेल अपयशी ठरलो आहोत। अन्यथा एक हजार वस्ती असलेल्या गावच्या जात पंचायतने १०० कोटीच्या वर लोक संख्या असलेल्या देशाच्या संविधानाला ठेंगा दाखविला नसता.
काही विद्वानांच्या मते ज्या क्षेत्रात अशा समाज हत्या होतात तेथे लग्नाच्या वयाच्या मुला-मुलींच्या संख्येचे व्यस्त प्रमाण आहे। पण मुलींचे प्रमाण कमी होण्या आधी पासुनच अशा हत्या होत आहेत। अशा ह्त्या करणारेच स्त्री-भ्रूण ह्त्या करण्यात आघाडीवर आहेत हे विसरून चालणार नाही. काहींच्या मते स्त्री स्वातंत्र्य व स्त्री -पुरुष समानता याला विरोध असनारेच अशा ह्त्या करतात किंवा जग भर स्त्रियांवर स्त्री म्हणून
होणारे अत्याचार याचाच समाज ह्त्या हां भाग आहे.समाज हत्याना बलि पडलेल्या प्रामुख्याने स्त्रिया असल्या
तरी फ़क्त स्त्रीयाच नसतात हे लक्षात घेतले पाहिजे। अन्य जाती धर्मातील व्यक्तिशी किंवा सगोत्र विवाह (याला कायदेशीर मान्यता आहे.)केल्याने ज्या स्त्रियांची हत्या झाली त्या बहुतांश प्रकरणात त्यांच्या जोड़ीदार पुरुषाची
तितक्याच क्रूर पणे हत्या झाली आहे.आणि आपल्या देशात सवर्णा कडून दलितान्च्या अशा समाज हत्या होण्याचे प्रमाण मोठे आहे। म्हनुनच या समाज हत्याकडे फ़क्त स्त्रीया वरील अत्याचार असे पाहता येणार नाही.
स्त्रियांवर सर्व साधारण पणे जग भर सारखेच अत्याचार होतात.पुढारलेल्या आणि मागासलेल्या देशात या अत्त्याचाराच्या बाबतीत विलक्षण साम्य असते। हे साम्य आपणास स्त्रीयांवारील बलात्काराच्या बाबतीत दिसेल
किंवा मारहाण करने ,मान हानी करने या बाबतीतही दिसून येइल.पण समाज हत्या सारख्या बाबी प्रगत राष्ट्रात
अपवादानेच दिसतात.तेथे घडणारी समाज ह्त्या सुद्धा प्रामुख्याने तिसर्या जगातून तेथे स्थायिक झालेल्या कडून
होतात हे लक्षात घेण्या सारखे आहे.
मग तीसरे जग आणि समाज हत्या याचा सम्बन्ध काय आणि तिसर्या जगात समाविष्ट सर्वच देशात समाज हत्या सर्रास का घडतात या अंगाने या प्रश्नाचा उहापोह करण्याची गरज आहे.हे तीसरे जग आपल्या उपजिविकेसाठी मुख्यत: शेतीवर अवलंबून आहे.या सर्व देशातील बहुसंख्य लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.तीसरे जग आणि प्रगत राष्ट्रे यांच्यातील हाच मोठा आणि महत्वाचा फरक आहे। अर्थात खनिज तेलाने संपन्न असलेली मुस्लिम राष्ट्रे तिसर्या जगात समाविष्ट आहेत आणि शेती हां मुख्य व्यवसाय नसतानाही तेथे समाज हत्या होतात हे खरे आहे। पण तेथे धर्माधिरित कायद्याने हत्या होतात.हे कायदे चुकीचे,अमानवीय व अमानुष आहेत या बाबत दूमत असू शकत नाही.पण कायदे बदलत नाहीत तो पर्यंत या रानटी हत्याना कायदेशीर हत्याच म्हनने भाग आहे.वास्तविक मुस्लिम राष्ट्रे आणि जगातील अन्य राष्ट्रे यांच्यात स्त्रिया कड़े भोग वस्तू व गुलाम म्हणून बघण्याचा समान दृष्टीकोण आहे.मुस्लिम राष्ट्रानी या अत्त्याचाराना शरियतचा वैधानिक आधार दिला इतकेच.आपला मुद्दा समाज हत्येचा असल्याने स्त्रियांवरिल अन्य अत्त्याचारान्चा येथे विस्ताराने विचार करने अप्रस्तुत ठरेल. शेतीवर आधारित समाजातच समाज ह्त्या होतात हे सत्य आपणास नाकारता
येणार नाही.आज ज्या हत्या चर्चेत आहेत त्या प्रामुख्याने जाटबहुल हरियाणा,उत्तर प्रदेशचा मोठा भाग आणि पंजाब या क्षेत्रातील आहेत.या भागातील एकमेव व्यवसाय शेती हाच आहे.ही बाब माझ्या विधानाची पुष्टी करणारी आहे। शिवाय देशाच्या अन्य भागात दलितांची समाज हत्या प्रामुख्याने ज्यांचा शेती हाच व्यवसाय आहे अशा समाजाकडून होतात.महाराष्ट्रात ते कुणबी असतील ,अन्य ठिकाणी जाट ,यादव असतील.शेतीवर आधारित
समाजातच प्रामुख्याने अशा प्रकारच्या समाज हत्या का होतात याची कारणे शोधल्या शिवाय समाज हत्या समाजातून हद्दपार करने कठीण आहे।
शेतकरी समाजाशी सम्बंधित जात पंचायती आणि तुलनेने मागासलेल्या समजल्या जाणार्या भटक्या व आदिवासी समाजाच्या जात पंचायती यांच्यातील फरक समजुन घेणे उपयुक्त ठरेल। ज्या अपराधा
साठी शेतकरी ज़ात पंचायत देहान्ताची शिक्षा देते त्या अपराधासाठी भटक्यांची पंचायत आर्थिक दंड करेल,
फार तर बहिष्कार टाकील.आदिवासी जात पंचायत तर याला अपराधच मानणार नाही.शेतीच्या दुष्ट चक्रात न अड़कल्याने हे समाज अधिक उदार आहेत हाच याचा अर्थ होतो.
याचा अर्थ शेतीत जो अड़कला तो फ़क्त गरीबीतच अडकत नाही ,तर सर्व प्रकारचे मागासलेपण
त्याला जखडून टाकते.शेतीच्या चक्रात अड़कलेल्याला नव्या व आधुनिक विचाराचा स्पर्श ही होने कठिन असते
हे शेतकरी समाजाकडे पाहिले तरी लक्षात येते। कारण समजनेही कठीण नाही.शेतीतुन पदरी पडते ते फ़क्त
दारिद्र्यच।शेतीत पीक अमाप येत असेल पण त्याच्या जीवनात आशा-आकान्क्षाचा अंकुर कधी फुटत नाही.
माणूस म्हणून कोणतीही किम्मत नसलेला ,मान सन्मानाला पारखा झालेला वैफल्यग्रस्त समाज शेवटी स्वत:चा
सन्मान स्त्री आणि दलित याना पायदली तुडवून प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असावा हे मानायला जागा आहे.
शेतीतुन उपजनारी ही कटुता आणि क्रूरता सर्व प्रथम बाबासाहेब आम्बेडकरांच्या ध्यानात आली.म्हनुनच त्यानी दलित समाजाला गाव सोडण्याचा सल्ला दिला.अत्याचार आणि अपमान सहन करीतच
जगणारा हां समाज बाबासाहेबांचा सल्ला ऐकून शेती पासून दूर गेला आणि अभूतपूर्व प्रगती साधत सन्मान
प्राप्त केला। आपल्या पेक्षा जे दुर्बल आहेत त्यांच्यावर अत्याचार करून किंवा त्यांची हत्या करून नव्हे तर शेती सोडूनच सन्मान प्राप्त होइल हे शेतकरी समाजाला समजत नाही तो पर्यंत समाज ह्त्या (ऑनर किलिंग) थांबणार नाहीत हे सत्य आम्हीही समजुन घेतले पाहिजे।

---सुधाकर जाधव

मोबाइल -9422168158

3 comments:

  1. Daniel Mazgaonkar wrote:
    I do not agree with you. If a large section of people give up farming, Then you say, the backward thoughts of that section will improve, there will not be honour killings, I do not understand this logic.

    I shall read your blog again, but the cursory reading made me respond to your view.

    I am at the moment not in Bombay, but have come to visit my sons and daughter in law, Swati who works in village Mozda and also edits Bhumiputra. So, for some days I am here. So, will write more when I am at my place.

    Daniel.

    ReplyDelete
  2. आपल्याकडील शेती दारिद्र्यग्रस्त आहे यात प्रश्नच नाही. शेती करण्याच्या व्यवसायातील सर्व जाती बव्हंशी बौध्दिकदृष्ट्या मागासलेल्या राहिल्या आहेत यातही वाद नाही. परंतु याचा अर्थ अन्य व्यवसायांत सारे काही आबादी आबाद आहे असे नाहीच.शेती सोडली तर बौध्दिक दिवाळखोरीची परिस्थिती सुधारेल असेही नाही. आपण ज्या शेती सोडलेल्या दलितांचा उल्लेख करता त्यांचेही व्यवसाय बदलले म्हणून सवयी बदलल्या, अंधश्रध्दा मावळल्या असे फार मोठ्या प्रमाणात झालेले नाही. तिसऱ्या जगातले किंवा आपण म्हणता तसे मागास जगातले सारे प्रश्न अखेर समृध्दी नसण्यापाशीच येऊन अडलेले आहेत.अमेरिकेतही शेती करणारे आहेतच. तिथे नाही असले तथाकथित ऑनर किलिंग होत.
    तुम्ही वापरलेला शब्द समाज हत्या हा शब्दही योग्य नाही. हे सरळसरळ गुंडगिरीने पाडलेले खून आहेत. आपल्या माध्यमांनी त्याला खूनच म्हटले पाहिजे.पण त्यांना कोण काय शिकवणार...
    तस्मात्, आपण केवळ शेती आणि शेतीशीच या खूनखराब्याचा, स्त्रियांवरील अत्याचाराचा संबंध जोडलेला मला पटत नाही.आपण सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेले आहोत एवढेच सर्वसाधारण विधान मला सर्वसमावेशक वाटते. या मागासलेपणात शहरी नोकरदार, औद्योगिक कामगारही सारखेच भागीदार आहेत. खूनखराबा न करणारे लोक धनखराबा करून इतर फालतू अंधश्रध्दांना खतपाणी घालतात. पुढल्या पिढीलाही तेच वळण लावतात.

    ReplyDelete
  3. As you say, the word Honor Killing has resulted from the mentality of people reporting the crime. I agree with this to certain extent.

    However, your logic appears to me to be faulty. It is the mentality of killers that should have been your target. To say that it has arisen because of the farming practices seems to be stretching the logic too far!

    I suppose the pshychologists or psychiatrists may be able to provide some clues here. Perhaps, it can also be linked to the Animal Side of Humans.

    Nevertheless, your attempt can be considered as a step towards discussion of this heinous crime against humanity.

    ReplyDelete