मी लेखन करावे असा माझ्या आप्त स्वकियांचा सतत आग्रह असतो .मी चांगल लिहितो या गैरसमजातून त्यांचा हा आग्रह आहे.त्यांची सततची भुन भुन दूर करण्यासाठी नव्हे तर स्वत:च्या लेखन सामर्थ्याचा प्रत्यय घेण्या साठी लिहितो आहे.
ब्लॉग साठी 'common non sense' हे नाव दूरचित्रवाणी वरील सर्व चानेल वरील बातम्या आणि मालिका पाहून सुचले असले तरी त्या विषयी लिहिण्यात मला स्वारस्य नाही.बातम्या आणि मालिका हा सरसकट common non sense चा बटबटित प्रकार असला तरी समाजाच्या सर्वच क्षेत्रात common non sense चा धुडगुस दिसतो.मालिका आणि बातम्यातील उथल पनातुन आणि अन्य क्षेत्रात झापड़ बंद पनातुन common non sense चा धुडगुस सुरु आहे.पूर्वग्रह दूर ठेवून प्रश्न समजुन घेवुन सोडविन्याची आमची कुवत क्षीण झाल्याचे हे द्योतक आहे .म्हनुनच धान्या पासून दारू निर्मितीच्या विरोधकाना झींग चढलेली दिसते .ही झींग नैतिकतेची असली तरी शेवटी झींगीतुन तारतम्य लोपतेच !समाज जीवनात तारतम्य लोपल्याची जाणीव या शीर्षका तुन होते ,म्हणून मी ते निवडले आहे.
या ब्लॉग मधून सामाजिक ,आर्थिक वा राजकीय झापड़बंद पनावर प्रहार करण्याची भूमिका नाही.कारण प्रहार करण्या साठी झींग लागेल! वर्त्तमान घटना क्रमा तुन झापडबंद पना निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न या ब्लॉग च्या माध्यमातून करणार आहे.आपल्या प्रतिक्रिया ही लिखाणाची प्रेरणा नसली तरी त्यातून लिहिण्या साठी बल प्राप्त होईल .धन्यवाद.
१मे २०१० -सुधाकर जाधव
ब्लॉग विश्वात आपले स्वागत.
ReplyDeleteपुढील लेखनास शुभेच्छा...!!