Sunday, December 5, 2010

लक्ष भोजन ते लक्षावधीना मेजवानी

लक्ष भोजन ते लक्षावधीना मेजवानी
मोहिते ते गडकरी व्हाया मुंडे--बदलत्या मुल्यांचा प्रवास
मला नक्की आठवत नाही पण ते १९७३ साल असावे।या साली घडलेल्या एका घटनेने महाराष्ट्राचे समाजकारण आणि राजकारण प्रचंड तापले होते.महाराष्ट्र नुकताच जीवघेण्या दुष्कालातुन बाहेर पडत होता.अशा प्रसंगी शेती आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते यानी अकलूज येथे त्यांच्या घरच्या लग्नात पंचक्रोशीतील लोकांना जेवण दिले.सुमारे एक लक्ष लोक त्या प्रसंगी जेवले होते.महाराष्ट्र राज्य निर्मिती नंतरची सर्वात मोठी जेवनावल असे वृत्तपत्रातून त्याचे रकानेचे रकाने भरून वर्णन प्रसिद्ध झाले होते.ज्यांच्या कड़े शेती जास्त आणि ती सुद्धा बागायती म्हणजे ते माजलेले असणारच ही त्या काळच्या पुरोगामी महाराष्ट्राची सार्वत्रिक भावना .आणि सहकाराशी सम्बन्ध म्हणजे तर जास्तच माजलेले हे समीकरण रुढ़ आणि दृढ़ होते.शेतकरी समुदाया बद्दलची तुच्छतेची भावना उच्चभ्रू आणि शिक्षित समाजात आधीच ओतप्रोत.मग अशा शेतकरयाच्या नेत्याने लक्ष भोजन द्यावे हे सहन करण्या पलिकडचे होते.तसे जेवणात फारसे काही नव्हते.झंझनित रस्सा भाजी ,जिलेबी ,बूंदी असा बेताचाच बेत होता.तरीही साखर पोती आणि वनस्पती तुपाचा हिशेब काढून तो मांडल्या गेला.या उधलपट्टीने सर्वत्र संतापाची भावना निर्माण झाली होती.शंकरराव मोहिते पाटील महाराष्ट्राचे सर्वात मोठे खलनायक ठरले होते.नंतर तर पुरोगामी संघटना व पक्ष यानी भोजनावलीवर निर्बंध घालण्याची मागणी लावून धरली आणि मान्य ही करून घेतली.एवढेच नाही तर मोठ्या समारंभाच्या खर्चाचे हिशेब आयकर खात्याला देण्याचे बंधन घातल्या गेले होते.शेतकरी समाजाची दुरावस्था अशा उधलपट्टीने होते असे निदान करून त्यांच्या दारिद्र्याला त्यानाच जबाबदार धरून सर्व परिवर्तनवादी आणि समाजधुरीन कृतकृत्य झाले होते.पुढे शेतीच्या विपन्नते सोबत महाराष्ट्राची सम्पन्नता वाढू लागली ,कर्ज बाजारी शेताकरयाला नवे कर्ज मिळने दुरापास्त झाल्याने त्यांच्या पानीदार रस्सा भाजी व बूंदा याची जेवानावल जावून उपासमार सुरु झाली आणि दुसरीकडे संपन्न महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती अशा मेजवान्या देण्याची स्पर्धा सुरु झाली.एकाच लग्नात व्यक्तीचा पैसा ,रुबाब ,पद आणि प्रतिष्ठा पाहून वेग वेगळ्या मेजवान्या देण्याची परम्परा सुरु झाली.मोहिते पाटला कडच्या लक्ष भोजना नंतर लादण्यात आलेल्या निर्बंधाचे,आयकर खात्याला हिशेब देण्याच्या नियम बहुधा नव्या मेजवानी सत्राला लागू नसावेत.ते निर्बंध शेतकरी समुदायाला गरीबीच्या खाइत पडन्या पासून वाचविण्याच्या उदात्त भावनेने लादले होते ना! आणि आयकर अधिकारी शेतकरयाcह्या लग्नात जात नसल्याने आयकर खात्याला हिशेब देण्याची सक्ती केली असावी .पण आता या नव्या मेजवान्याना अक्खे आयकर खाते हजर राहात असल्याने त्याना वेगला हिशेब देण्याची गरजच काय!आणि मेजवान्यातुन गरीबी याच्या इतके हास्यास्पद तर्कट दुसरे नाही हे आता सर्वमान्य आहे.सम्बन्ध वाढविने आणि मजबूत करने या साठी आता या नव्या मेजवान्या आहेत.जेवढे सम्बन्ध वाढतील तेवढी सम्पत्ती वाढेल असे हे नवे मेजवानी शास्त्र आहे.हे शास्त्र खोटे असते तर आज भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी नागपुर च्या रेल्वे स्थानकावर हातात कटोरा घेवुन भीक मागताना दिसले असते!

नितिन गडकरी यांच्या मुलाच्या लग्नातील मेजवान्यांचे आणि पदार्थांच्या रेलचेलीचे जे वर्णन प्रकाशित होत आहे आणि प्रकाशात येत आहे ते लक्षात घेतले तर त्यानी मोहिते हे लक्ष भोजना संदर्भातील नावच सन्दर्भहीन करून टाकले!एवढेच नाहीतर गडकरी यानी आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्धी गोपीनाथ मुंडे यानाही मान खाली घालायला लावली.गेल्या वर्षीच मुन्डेनी आपल्या कन्येच्या विवाहा निमित्त पुणे येथील एका महाविद्यालयाच्या प्रान्गनात भव्य मेजवानीचे आयोजन केले होते.तो समारंभ पाहून तेव्हा उपस्थितांचे डोळे नक्कीच दीपले असतील.पण गडकरी यांच्या कडील समारम्भाने उपस्थितांचे डोळे विस्फारून-विस्फारून बुबूल बाहेर पडण्याची वेळ आली असेल.मुन्डेनी संख्येच्या बाबतीत फार तर मोहिते पाटलाची बरोबरी केली असेल पण गडकरीनी या दोघानाही किती तरी मागे टाकले कदाचित नवा विक्रम ही प्रस्थापित केला असेल.मोहितेंच नाव फ़क्त संख्येच्या बाबतीत घेतले जायचे.इतर तामझामाच्या बाबतीत आता त्यांची गणना 'किस झाड की पत्ती' अशीच करावी लागेल.मोहिते पाटलांचे भोजनार्थी बैल बंड्यातुन आले होते.गडकरी-मुंडे यांचे भोजनार्थी विमानातून ,आलीशान गाड्यातुन आणि कमीतकमी ५० हजाराच्या दुचाकी वरचे होते.पण यात ही गडकरीनी मुन्डेवर मात केली.मुंडे कड़े नागपुर हुन मंत्री -आमदार दोनेक विमानाने गेले होते.दिल्लीहून मुंडे कड़े फार तर एखाद-दुसरया विमानाने पाहुने आले असतील.पण गडकरी कड़े तर तब्बल चालीस विमानाने पाहुने आले होते.ही संख्या चुकू शकत नाही .कारण अक्ख्या नागपुर करानी या विमानाच्या मोजदादीचा आनंद घेतल्याची रसभरीत वर्णने प्रकाशीत झाली आहेत.विमाने सुद्धा कुठून कुठून आली होती !या प्रकाराने मुंडेचा जळफलाट नक्कीच झाला असेल,पण त्याच सोबत अकलूजच्या मोहिते पाटील परिवाराने सुटकेचा उसासा सोडला असेल.कारण भोजनावल आणि खलनायक मोहिते हे समीकरण आता लोकांच्या विस्मरणात जाईल.नव्या मेजवान्या आणि नवे नायक (खलनायक नव्हे)असे समीकरण आता रूढ़ होते आहे.मोहिते पाटलाना खल नायक म्हणून रंगविनारे आता या नव्या नायकांची आरती गात आहेत.गडकरी यांच्या मेजवानीचे वृत्तपत्रातील रकाने वाचले तर याची प्रचिती येइल.भाऊन्चे असे होते,भाऊनी अमुक केले-तमुक केले.भाऊचे किती कौतुक !मोहिते पाटलांच्या नावाने शंख करणारे ,दुष्कालाच्या पार्श्वभूमीवर लक्ष भोजन देवून समाजाप्रती असंवेदनशील असल्याचा मोहिते पाटलावर ठपका ठेवणारे आज हयात असलेले राजकारणी आणि समाजकारणी आता अशा मेजवान्यात सामील होण्यात धन्यता मानताहेत.मुन्ड़ेची मेजवानी शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर झाली.गडकरीन्च्या मेजवानीला शेतकरी आत्महत्ये सोबत निसर्गाच्या कोपाने हीन दीन झालेल्या शेतकरी समुदयाची पार्श्वभूमी आहे.गडकरी यांच्या पक्षाच्या आमदारानी या मुद्द्यावर विधान सभेचे कामकाज होवू दिले नाही.मात्र हेच आमदार मेजवानीचा हां कार्यक्रम व्यवस्थित पार पाडन्यासाठी मनोभावे झटत होते आणि विधिमंडलाच्या कामकाजात व्यत्त्यय आणल्या बद्दल सभागृहात या आमदाराना दुषने देणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार मेजवानीचा कार्यक्रम सुरलित पार पाडन्या साठी झटनार्या आमदाराचे कौतुक करीत होते.महाराष्ट्रातील ओल्या दुष्काला च्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेजवानी बद्दल कोणालाच खंत नव्हती!त्यांचे सोडा ते तर चोर चोर मौसेरे भाई आहेत.पण इतर भाई आणि साथीन्चा आवाज तरी कुठे ऐकू येतो?मोहिते पाटला विरुद्ध जिवाचे रान करणारे बाबा आढव आज का शांत आहेत?

शेती आणि सहकाराची वाताहत झाली तशीच मोहिते घरान्याचीही झाल्याचे आपण बघतोच आहोत.पण राजकारनाची शेती करणारी ही नवी घराणे संपन्नतेची नवी दालने पादाक्रांत करीत चालले आहेत.अशा मेजवान्या त्याना दारिद्र्याच्या खाइत लोटन्या ऐवजी सम्पन्नतेच्या शिखराकडे नेत आहेत.आता गड्करीचेच उदाहरण घ्या.सरसंघचालक देवरस यान्चेकडून स्वत:साठी पहिली सेकण्ड हैण्ड चारचाकी घेणारे गडकरी(ही माहिती मी श्री धनन्जय कर्णिक यांच्या 'उठाठेव 'या ब्लॉग वरून घेतली आहे.) अवघ्या काही वर्षात मुलाला लग्नाची भेट म्हणून महागडी गाड़ी देतात!मेजवानीच्या खर्चाच्या भाराने ते अजिबात वाकले नाहीत हेच या वरून स्पष्ट होते.उलट या मेजवानीने त्यांची बरीच ओझी हलकी केली असावीत.कोणत्याच बाबतीत आपण गोपीनाथ मुंडे पेक्षा कमी नाही,असलो तर काकनभर सरस आहोत हे या निमित्ताने स्वत:च्या पक्षातील नेत्याना दाखविता आले.शिवाय ते संघाला लग्नात राबवून घेतात तसे निवडनुकीतही राबवून घेवु शकतात याची जाणीव पक्षातील अन्य नेत्याना करून देण्यात तर ते कमालीचे यशस्वी झाले असतील!शक्ती आणि संपत्तीच्या या प्रदर्शनाला अन्ना हजारेना हजेरी लावायला लावून आपले सगळे वैभव वैध असल्याचा आभास निर्माण केला असे नव्हे तर वैधते वर अन्नांचे शिक्कामोर्तब करून घेण्यात ही गडकरी यशस्वी झालेतअसेच म्हणावे लागेल.आता हां अफाट आणि अचाट खर्च करण्यासाठी पैसा कोठून व कसा आला हे त्याना कोणी विचारूच शकत नाही!तर असा मोहिते ते गडकरी व्हाया मुंडे हां प्रवास.हां प्रवास या व्यक्तींचाच नाही.समाजाच्या संकल्पनात ,दृष्टीकोनात व मुल्यातील बदल अधोरेखित करणाराही हां प्रवास आहे.या लेखात व्यक्तींचा वा त्यांच्या पक्षाचा उल्लेख प्रासंगिक म्हणून अपरिहार्य होता.पण उड़दा माजी काले-गोरे काय निवडावे निवडनारे हेच खरे!--सुधाकर जाधव.(मोबाईल-९४२२१६८१५८). ssudhakarjadhav@gmail.com

pandharkawada ,dist.yavatmal.

4 comments:

 1. या एका जेवणावळीचे काय घेऊन बसलात राव. आपल्या अनेक राजकीय मनसबदारांचे रोजचे खर्च काढाल, त्यांच्या मुलांच्या वरखर्चाचे हिशेब काढाल तर एवढी जेवणावळ तर स्वाभाविकच आहे हे तुम्हाला पटेल.महाराष्ट्र नवनिर्माणाचा नारा देणाऱ्यांचा रोजचा खरंच पन्नास हजारांच्या खाली नसतो हे त्यांच्या निकटवर्तियांकडून खात्रीशीर कळले आहे. मोहितेपाटलांनी तर निदान पंचक्रोशीतल्या सामान्य शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पोराबाळांना जेवू घातले.त्यांचीही जेवणावळ सत्तागामीच होती. पण त्यात लोकशाही सत्तासंपादनासाठी आवश्यक अशा लोकानुनयाची गरज ओळखून ते जेवण घातले गेले होते. गडकरी, मुंडे हे भाजपवाले असोत की काँग्रेसचे अलिकडले नेते असोत, त्यांच्या जेवणावळींना त्यांच्या मतदारसंघातले बलशाली लोक सोडले तर बाकीचे सारे पदवंत, धनवंत, सत्तेचे दलाल, राजकीय बॉस,दांडगे पत्रकार, थोडक्यात फसवणुकीसाठी उपयुक्त असलेल्या साऱ्यांचीच उपस्थिती जास्त असते.
  मला त्या काळी शंकरराव मोहिते पाटलांवर गोविंदराव तळवलकरांनी खवळून खवळून लिहिलेल्या अग्रलेखाची अजूनही गंमत वाटते.त्या लग्नाच्या निमित्ताने तेव्हा अनेक शेतकऱ्यांना गोडधोड मिळाले असेल, थंड पाणी पिण्याचा आनंद मिळाला असेल. पण आपणच पुरोगामी असल्याच्या भावनेचे बाशिंग बांधलेले सारेच त्या जेवणावळीवर शिंग रोखून होते.
  लोकशाहीतील लोकानुनयाचे रंग बदलले भाऊ. आता लोकानुनय हा दलालांच्या मार्फतच होतो.त्यांची दलाली देण्याचे हे एक घरगुती निमित्त होते म्हणा आणि सोडून द्या झालं. नाहीतरी फसवणुकीतूनच गोळा झालेला पैसा यापेक्षा जास्त उत्पादक होऊ शकलाच नसता.
  अशीच नांदो लोकशाही... सौख्यभरे...

  ReplyDelete
 2. Mala manpasun kutuhal ahe, sitaram kesri pasun Nitin Gadkari paryanta (Datta Meghe wagaire alech) first Gen. Rajkarni kiti ani kase income dakhawtat? Ya sarwanchya nirdhawale panacha kautuk karawa tewadha thodach. Tyahunhi jasta swtaha kharach pramanik pane jagnyacha prayatna karnare (Shakyato! mhanje swataha bribe nahi ghetali pan garaj padel tenwha denare!!) yacha samarthan kartat tyanche.

  ReplyDelete
 3. chetana_wda@bsnl.in to me  Dear Sudhakar,

  Nice you sent this and remembered me.

  Your writeup is interesting and awakening for everybody and people at large.

  "Common non sense" is very interesting and meaningful title !--Ashok Bang

  ReplyDelete
 4. A good issue raised in the article. But, dinner diplomacy rules the world!

  Perhaps, an appropriate gesture for the common public would have been the simultaneous event of community marraiage of the children of thefarmers who committed suicide in the wake of the natural and artificial calamities.

  ReplyDelete