"१९७४ नंतर या देशातील तरुण प्रथमच पोटतिडिकेने देशाचा विचार करू लागला आहे.केवल विचारच नाही तर कृती करण्याची
प्रेरणा व् उर्मी अन्नान्च्या आंदोलानातुन त्याला मिळाली हेच खरे तर या आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे!"
अन्नांचे आन्दोलन - लोकशाहीला तारक आणि मारक
प्रेरणा व् उर्मी अन्नान्च्या आंदोलानातुन त्याला मिळाली हेच खरे तर या आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे!"
अन्नांचे आन्दोलन - लोकशाहीला तारक आणि मारक
एखादी वावटळ यावी आणि सर्वाना गरा-गरा फिरवून काय होते आहे हे कलायच्या आत निघून जावी तसे अन्ना हजारेंच्या आंदोलनाचा झंझावात आला, केंद्र सरकारला व् सर्व सामान्यानाही गरा गरा फिरवून निघून गेला.असे फिरल्याने डोके गरगरते व् डोक्याला धरून बसावे लागते तशी अवस्था केंद्र सरकारची झाली आणि समर्थन व् विरोध करनाऱ्यान्ची सुद्धा झाली.केंद्र सरकारला आपण काय करून बसलो हे जसे कळत नाही आहे तसेच समर्थन करनाऱ्याला आपण
कशाचे समर्थन केले आणि विरोध करनाऱ्याला आपण अजुनही कशाचा विरोध करीत आहोत हे
उमजेनासे झाले आहे.कारण या आंदोलनाचे जे स्वरुप समोर आले त्याची जशी विचारपूर्वक आखणी
कोणी केली नव्हती तशीच विचाराची चौकट ही या आंदोलनाला देण्याचा कोणी प्रयत्न केला नव्हता.अन्ना उपोषनाला बसणार याची पूर्व कल्पना असली तरी त्याचा परिणाम असा होइल याचा अंदाज कोणालाच नव्हता.हे अगदी एखाद्या त्सुनामी सारखे झाले.त्सुनामी ची पूर्वकल्पना आली तरी आली तरी समुद्रातील लाट किनाऱ्यावर येवून किती मोठी होइल हे जसे सांगता येत नाही तसेच काहीसे अन्नान्च्या आंदोलनाचे झाले आहे!त्सुनामी लाट जशी नैसर्गिक तसेच सद्य स्थितीत या आंदोलनाच्या निमित्ताने लोकभावनेचा झालेला उद्रेक स्वाभाविक मानला की मग आंदोलना सम्बधीचा भावनिक व् वैचारिक काथ्याकुट बिनबुडाचा व् निरर्थक ठरतो .आज आन्दोलना सम्बद्धी असाच काथ्याकुट सुरु आहे!
भावनावेग व् विचारांचा अभिनिवेश दूर सारला तरच या आंदोलनाचा अर्थ आणि अन्वयार्थ लक्षात येइल.या आंदोलनाच्या बाबतीत चांगले आणि वाईट अशा दोन टोकाला जावून
विचार करण्या ऐवजी नीर क्षीर विवेक बाळगुण आन्दोलनाकडे बघितले पाहिजे.तसे बघितले तर आपल्या लक्षात येइल की आंदोलनात जशा चांगल्या बाबी आहेत तशा वाईट बाबी देखील आहे.या आंदोलनाची काही बलस्थाने आहेत तर अनेक कमजोर बिन्दुही आहेत.यातून भ्रस्टाचारा सारखा
अतिशय भयावह प्रश्न केंद्र स्थानी येवून ती विषवल्ली उखडून टाकण्याचे प्रयत्न या आंदोलनाच्या
निमित्ताने सुरु झाले आहेत,तसेच या आन्दोलानातुन नवे प्रश्न , नव्या समस्या देखील उभ्या राहिल्या आहेत हे मान्य करावे लागेल.चान्गल्यातुन वाईट वजा होते की वाईटातुन चांगले वजा होते या आधारे
आपल्याला या आंदोलनाचे यशापयश मोजता येइल.
आन्दोलन कसे उभे राहिले?
गेल्या सार्वत्रिक निवडनुकी नंतरचा केंद्र सरकारचा कारभार निष्क्रियता व् जन समस्या प्रती कमालीची अनास्था या कारणाने निराशाजनक ठरत असतानाच राज्यकर्त्यान्च्या भ्रस्टाचाराची मोठ-
मोठी प्रकरणे समोर येवू लागली.यात भर पडली ती विरोधी पक्षाच्या भ्रस्टाचाराच्या प्रकरनांची!विरोधी पक्षांच्या सरकारांची परिस्थिती कोंग्रेस सरकार पेक्षा वेगली नाही व् सर्वच पक्ष व् त्यांची सरकारे भ्रष्ट
आहेत अशी चर्चा व् समज याने मुळ धरले.लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर म्हणजे संसदेत लोकांच्या समस्यांची ,उघड झालेल्या भ्रस्टाचाराची व् त्यावरील कारवाईची चर्चा होण्या ऐवजी विरोधी व् सत्ताधारी दोघानाही चर्चे ऐवजी संसद बंद पाडण्यात जास्त रस असल्याचे लोकानी पाहिले.राज्यकर्ते व् विरोधी पक्ष करतात तरी काय हे जनतेलाही समजत नव्हते.आपली व् देशाची पक्षाना व् नेत्याना अजिबात काळजी नाही आणि ही सगळी मंडळी आपल्या तुम्बड्या भरण्यात मग्न आहे असे लोकमत तैयार होवू लागले.ज्यानी अशी प्रकरणे बाहर काढून वेशीवर टान्गायाला हवी होती ती
प्रसार माध्यमेच भ्रष्ट होत चालल्याचे निदर्शनास आल्याने निराशा वाढली.या देशाच काहीच आणि कोणीच
भले करू शकत नाही असे वाटत असतानाच या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने लोकांच्या मनातील असंतोष व् निराशेला वाट करून दिली.काला पैसा ,भ्रस्टाचाराची प्रकरणे या बाबत सर्वोच्च न्यायालयाने ठाम
आणि कठोर भूमिका घेतल्याने लोकांच्या मनातील निराशा आशेत परिवर्तित होवू लागली.केन्द्रीय दक्षता आयुक्त म्हणून थॉमस यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने पन्तप्रधानासकट सरकारची विश्वासार्हता धुळीला मिळाली.या प्रकरणी न्यायालयात जी चर्चा झाली ,न्यायालयाने जी निरिक्षने नोंदविली ती खरी तर अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा आधार व् प्रेरणा ठरली .
जन लोकपाल बिलाचा उगम
गेल्या अनेक वर्षा पासून लोकपाल बिल धुळ खात पडले आहे हे खरे आहे.राजकीय इच्छा शक्तीचा अभाव हे त्यामागचे महत्वाचे कारण तर आहेच ,पण पंतप्रधानपद लोकपालाच्या
कक्षेत आनन्या बद्दल असलेला अनेकांचा विरोध,प्रामाणिक व् तात्विक मतभेद आणि भ्रष्टाचार विरोधी प्रबल कायदे अस्तित्वात असने हे देखील लोकपाल बिल धुळ खात पडण्या मागे एक कारण होते. पक्षा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीने ,संस्थेने ,संघटनेने किंवा कोणत्याही आन्दोलनाने देखील कधीच
या बिलाचा आग्रह धरल्याचा दाखला नाही.यापूर्वी भ्रष्टाचार विरोधी अनेक आंदोलने व् उपोशने अण्णा
नी केलीत ,पण त्यावेळी खुद्द अन्नानी देखील लोकपाल बिलाचा आग्रह रेटला नाही.आणखी एक महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घेतला पाहिजे.मागच्या लोकसभेत नोटाची पुडकी दाखवून सरकार भ्रष्ट
असल्याचे सांगितले गेले होते.त्या नंतर झालेल्या सार्वत्रिक निवडनुकित मनमोहनसिंह सरकारचा
भ्रष्टाचार हां महत्वाचा मुद्दा होता.अशा निवडनुकित सुद्धा लोकपाल बिलाचा मुद्दा कोणीच पुढे केला
नव्हता-अगदी अन्नानी किंवा आज जे त्यांचे या आंदोलनातील सहकारी आहेत त्यानी देखील!सरकार ने अमुक काम करावे तमुक काम करावे यासाठी उठ सुठ जनहित याचिका काही वर्षा पासून न्यायालयात
सतत दाखल होत असल्याचे आपण पाहत आहोतच .आज चर्चेत असलेल्या जन लोकपाल विधेयकाचे
एक कर्ते श्री.प्रशांत भूषण अशा याचिकान्च्या बाबतीत आघाडीचे वकील मानले जातात.त्यानी सुद्धा
लोकपाल बिला संदर्भात न्यायालयीन निर्देशाची मागणी केली नाही.थॉमस प्रकरणा पर्यंत सरकार पासून आन्दोलकापर्यंत सर्वानाच विसर पडला होता हे सत्य आहे.जन लोकपाल बिलाचा अभ्यास केला तर आपणास दिसून येइल की थॉमस प्रकरनानंतर घाई-घाईत हे बिल तैयार करून पुढे रेटन्यात
आले.सर्वोच्च न्यायालयाने थॉमस प्रकरणात ज्याच्यावर कोणतेच शिंतोडे उडालेले नाही अशी बेदाग़ व्यक्ती सतर्कता आयुक्त पदी असली पाहिजे आणि ती व्यक्ती सरकारी यंत्रनेत सापडत नसेल तर समाजात शोधायला काय हरकत आहे असे विचारले होते.या मताचा वापर जन लोकपाल बिल तैयार करण्यात झाला आहे.
जन लोकपाल बिल निमित्त बनले
घाई-घाईत असे विधेयक तैयार करून आणि अन्नान्च्या खांद्यावर बन्दुक ठेवून ते पुढे रेटन्यात कोणाचा काय हेतु होता हे सांगणे कठिन आहे.एक मात्र नक्की सांगता येइल की या
मुद्द्यावर जन आन्दोलन उभे करण्याचा कोनाचाही उद्दयेश नव्हता,किम्बहुना असा रेटा तैयार होइल
अशी कोनाचीच अपेक्षा नव्हती.आन्दोलाकाकडून जन आंदोलनाची भाषा पहिल्यांदा वापरल्या गेली ती
अन्नान्च्या उपोषनाच्या तिसऱ्या दिवशी!याचे कारण जनतेचा लाभलेला अनपेक्षित पण उत्स्फूर्त प्रतिसाद.अण्णा पुढे झाले आणि लोकांच्या भावनेचा बांध फुटला.लोकांच्या मनात राज्यकर्त्या बद्दल
आणि राजकीय नेत्याबद्दल खदखदनारा ज्वालामुखी बाहेर पडला.असंतोष तर जाणवत होताच पण तो असा उफालुन येइल हे कल्पनातीत होते.यात इंटरनेट वापरणारा तरुण मोठ्या संख्येने पुढे आला.अरब
देशात इंटरनेट च्या माध्यमातून तरुणांचा जो उठाव झाला तेव्हा पासूनच भारतीय तरुणांची चलबिचल
सुरु होती.अन्नान्च्या उपोषनाने या तरुनाना आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली.जन लोकपाल बिल काय आहे ,त्याने काय होइल हे जाणून घेण्याची गरजही कोणाला वाटली नाही.कारण
ते बिल भ्रष्टाचार निर्मुलानासाठी असून ते पास झाले की भ्रष्ट राज्यकर्ते तुरुंगात खडी फोडायला जातील
एवढी ऐकीव माहिती आंदोलनात सामील सर्वासाठी पुरेशी होती.त्या बिलाचे बारकावे माहीत नसणे हे देखील आन्दोलनास बळ देनारेच ठरले.एकुणच या आंदोलनाला लोकांचा लाभलेला पाठिंबा हां माहीत
नसलेल्या जन लोकपाल बिलासाठी नव्हता ,तर अन्नांचे उपोषण हे त्यांच्यासाठी भ्रष्टाचार विरोधी
लढाइचे प्रतिक आणि प्रारम्भ होता.दूसरी महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनात लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असे घडले नाही तरी सुद्धा लोकसमर्थनाची लाट आहे याची जाणीव सर्व सामान्या प्रमाणेच आंदोलक नेते ,सरकार आणि प्रसार माध्यमे याना सारख्या प्रमाणात झाली ही आज पर्यंतच्या आन्दोलना पेक्षा नविन आणि वेगली बाब होती हे मान्य करावे लागेल.म्हनुनच आंदोलनाचे
कोणतेही संघटन किंवा नेटवर्क नसतानाही सरकारला नमते घेणे भाग पडले.माध्यमानी या आंदोलनाचा अतिशय उथल आणि प्रचारकी थाटात बटबटीत प्रचार केला . पण त्यानी हे आन्दोलन मोठे केले असे म्हनने म्हणजे त्यांच्या नसलेल्या समज शक्तीला व् कर्तृत्वाला अवाजवी महत्त्व देण्या सारखे होइल.
अन्नांचे नेतृत्व
हे आन्दोलन पाच दिवसात संपले असले तरी त्याच्या परिणामाचा आवाका मोठा आहे आणि तो चांगला आणि वाईट या दोन्ही अर्थाने मोठा आहे. अन्ना हे निमित्त ठरले हे
समजुन घेतले तर त्यांच्यात नसलेले अवगुण उगालीत बसण्याचे कारण राहणार नाही किंवा दुसऱ्या टोकाला जावून त्याना गांधी हे बिरुद
बहाल करण्याचा अट्टाहास करण्याचे ही कारण नाही.अन्ना हे साधे -भोले ,धर्मभीरु सदगृहस्थ आहेत.
समाजातील वाईट बाबी दूर करून चांगल्या बाबिना प्रोत्साहित करण्याची त्यांची प्रमाणिक धडपड
समाजातील वाईट बाबी दूर करून चांगल्या बाबिना प्रोत्साहित करण्याची त्यांची प्रमाणिक धडपड
आहे.त्यासाठी प्राण पनाला लावण्याची त्यांची तयारी असते.त्यासाठी त्यांचे असे कोणतेच तत्वद्न्यान नाही.म्हनुनच ते कधी व्यक्तीच्या भ्रस्टाचारावर बोट ठेवून त्याना दूर करण्याचा
प्रयत्न करतात किंवा एखाद्या कायद्याने चांगले घडू शकते असा विश्वास त्याना कोनी दिला तर त्या कायद्या साठी ते जिवाचे रान करतात.यात अन्नान्चा कोणताच स्वार्थ नसल्याने सर्व साधारण व्यक्ती फार खोलात न जाता अन्नान्च्या
प्रयत्न करतात किंवा एखाद्या कायद्याने चांगले घडू शकते असा विश्वास त्याना कोनी दिला तर त्या कायद्या साठी ते जिवाचे रान करतात.यात अन्नान्चा कोणताच स्वार्थ नसल्याने सर्व साधारण व्यक्ती फार खोलात न जाता अन्नान्च्या
पाठीशी उभे राहतात.आज ही तेच घडले आहे आणि यापूर्वी असेच घडले होते.म्हनुनच माहिती अधिकार कायद्याचा आवाका लक्षात न येताही लोक अन्नान्च्या मागे उभे राहिले आणि आज जन लोकपाल बिलाच्या परिणामाची पर्वा न करता लोक अन्नाना पाठिंबा देत आहेत!अन्नांचे साधे पण हे त्यांचे शक्तीस्थान आहे आणि हीच त्यांच्या नेतृत्वाची मर्यादाही आहे.ही मर्यादा नसती तर लोकशाही साठी व् लोकहिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि क्रांतीकारी असलेला माहिती अधिकार कायदा अमलात आनन्यासाठी जिवाचे रान करणारे अन्ना त्याच ताकदीने लोकशाही व्यवस्थेची खिल्ली उड़विनारया जन लोकपाल बिलासाठी लढले नसते. यातील बारकावे त्यांच्या लक्षात आणून दिले तर त्यांच्या मतात बदल होईलही,पण त्यांच्या अवती भोवती असलेल्या लोकांना हे बिल पुढे रेटन्यात रस असल्याने तसे होने कठिन आहे.जनतेच्या
नावाने पुढे करण्यात आलेल्या विधेयकाची जनतेत चर्चाच करण्यात आली नाही.आणि फ़क्त जनतेच्या
मनात अन्ना विषयी असलेला विश्वास वापरून हे बिल पुढे रेटन्यात आले.एक प्रकारे अन्ना भोवती असलेल्या लोकानी जनतेचा केलेला हां विश्वासघात आहे असेच म्हणावे लागेल.अर्थात आहे त्या
नावाने पुढे करण्यात आलेल्या विधेयकाची जनतेत चर्चाच करण्यात आली नाही.आणि फ़क्त जनतेच्या
मनात अन्ना विषयी असलेला विश्वास वापरून हे बिल पुढे रेटन्यात आले.एक प्रकारे अन्ना भोवती असलेल्या लोकानी जनतेचा केलेला हां विश्वासघात आहे असेच म्हणावे लागेल.अर्थात आहे त्या
घातक स्वरूपात ते बिल संसदेत पारित होणार नाही हे खरे असले तरी या बिलाचा अति आग्रह यात अन्नांचा दोष नसताना देखिल त्याना संशयाच्या भोवरयात ढकलनारा ठरला आहे.
अन्नांची ऐतिहासिक कामगिरी
अन्नांचे उपोषण सुरु झाल्यावर देशभरातुन ज्या प्रतिक्रिया समोर आल्या त्या थक्क करनाऱ्या होत्या.तरुनाना राजकीय नेत्यांची आणि पक्षांची
अन्नांचे उपोषण सुरु झाल्यावर देशभरातुन ज्या प्रतिक्रिया समोर आल्या त्या थक्क करनाऱ्या होत्या.तरुनाना राजकीय नेत्यांची आणि पक्षांची
किती चीड आहे हे या निमित्ताने पहिल्यांदा समोर आले.चीड हां सौम्य शब्द झाला.खरे तर त्याना
घृणा वाटत आहे.राजकीय नेत्यांच्या स्वार्थी प्रवृत्तिने तरुनांचा लोकशाही वरील विश्वास उड़त चालल्याचे सत्य या निमित्ताने पुढे आले.अन्नांचे हे आन्दोलन सकृतदर्शनी लोकशाही विरोधी वाटते हे खरे.पण
याच आन्दोलनाने तरुणांच्या भावनाना वाट देवून लोकशाहीची मोठी सेवा केली आहे हे मान्य करावे लागेल.
याच आन्दोलनाने तरुणांच्या भावनाना वाट देवून लोकशाहीची मोठी सेवा केली आहे हे मान्य करावे लागेल.
या आंदोलानाचा नेता लोकशाही विरोधी प्रवृत्तिचा असता तर देशाला कदाचित हिटलरी प्रवृत्तिचा सामना करण्यात मोठी शक्ती खर्च करावी लागली असती.डॉ.आम्बेडकरानी विचारपूर्वक लोकशाहीच्या
आधार स्तम्भातील निर्माण केलेला समतोल जन लोकपाल बिलाने धोक्यात येइल हे खरे , पण राज्यकर्त्याच्या व् राजकीय पक्ष व् नेत्यांच्या नाकर्तेपनाने व् गल्लाभरू प्रवृत्तिने धोक्यात आलेले संविधान व् लोकशाहीला अन्नान्च्या आन्दोलनाने तात्पुरते का होईना जिवदान दिले याचे श्रेय अन्नाना द्यावे लागेल.आता राजकीय पक्ष व् नेत्याना आपली विश्वासार्हता परत मिळविन्या साठी प्रयत्न करण्याची निकड लक्षात आली असावी व् त्या साठी प्रयत्न करायला त्याना थोडा वेळ सुद्धा मिळाला आहे. या आन्दोलनाने लोक व् सरकार यांच्यातील सम्बन्धाना नवा आयाम दिला आहे.राज्य कारभारात
लोकांचा आवाज ऐकला गेला पाहिजे एवढेच नाही तर लोकांची समान भागीदारी निर्णय प्रक्रियेत असली
पाहिजे असा आग्रह लोकशाहीला पूरक व् बळकट करणाराच आहे.पण यातून पुन्हा या आन्दोलनाने
नवे प्रश्न निर्माण केले आहेत.सत्तेत असलेले लोक लोकानी निवडून दिले आहेत.पण जनतेचा प्रतिनिधी
कोण आणि कसा ठरविनार याचे उत्तर सोपे नाही.आज तरी लोकाना न विचारताच स्वघोषित लोकप्रतिनिधी
म्हणून आन्दोलनकारी नेत्यानी लोकपाल बिलाच्या ड्राफ्टिंग कमेटी वर वर्णी लावून घेवुन या व्यवस्थेतील धोका दाखवून दिला आहे.लोक सहभागातून आज पर्यंत अनेक बिलांची निर्मिती झाली आहे .आणि सामाजिक दृष्ट्या ही बिले महत्वाची होती.पण समितीवर नाव घोषित करून घेण्याचा
हट्ट कोनी धरला नव्हता.या बिलापैकी सर्वात महत्वाचे बिल अर्थातच अन्नान्च्या योगदानाने झालेल्या माहिती अधिकाराचे होते .पण त्या बिला बाबत असा हट्ट कोनी धरला नव्हता.आमचा सहभाग नसेल तर सरकार परिपूर्ण बिल आणणार नाही हे मान्य केले तरी सरकार वर खरा प्रभाव त्यात सामील व्यक्तींचा नाही तर आन्दोलनाचाच आहे हे कोणीही मान्य करेल..तर असे हे चान्गल्यातुन वाईट व् वाईटातुन चांगले निष्पन्न करणारे आन्दोलन आहे.चांगल्या-वाईटाची एवढी बेमालूम सरमिसळ
करणारे हे पहिलेच आन्दोलन असले तरी चान्गल्यातुन वाईट वजा होवून शिल्लक चांगलेच उरते आणि म्हणून फार मोठ्या अपेक्षा न ठेवता या आंदोलनाचे स्वागत केले पाहिजे.१९७४ नंतर या देशातील तरुण प्रथमच पोटतिडिकेने देशाचा विचार करू लागला आहे.केवल विचारच नाही तर कृती करण्याची
प्रेरणा व् उर्मी अन्नान्च्या आंदोलानातुन त्याला मिळाली हेच खरे तर या आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे! (समाप्त)
सुधाकर जाधव
मोबाइल-९४२२१६८१५८
पांढरकवडा,
जि.यवतमाळ
It's difficult to belive that the support that Anna's fast received was totally spontaneous. No movement in a country as big as ours can reach such proportions unless there is a powerful driving force behind it. One can see that the beneficiaries of the Aandolan had atleast partly preplanned the publicity that it was to receive. Look at the proper timing for the fast (soon after the World Cup)! Can it be taken as a mere coincidence? The question that this fast raises in sensitive minds is whether Anna himself fully understands the motives behind his Andolan- a simple minded person that he is? Or is he being used as a scapegoat for some malfide intentions? The doubt is strengthened since we have not heard any thought provoking statement directly from Anna on the matter he is supposedly fighting on his own accord!
ReplyDeleteMy comment may have a old fashionism with a sprinkle of leftism. Any movement without an overarching worldview. Non corruption for what, purity of life, (sadhanshuchita, shuddhikaran)? To have a peaceful life for middle class (rojchi katkat nako!)Or fighting a society which promotes accumulation of capital, fleecing working class and farmers.(Even preventing all kinds of graft will not prevent such exploitation, it may give some breathe to them, though.)Anna's movement has not consider these aspects. Nobody is asking for stringent enforcement of basic laws which are collectively beneficial to majority of the society. Preventing graft may mean 'don't ask us to pay' if we break these laws!
ReplyDelete