Sunday, August 8, 2010

स्त्रियांची अवहेलना :मानव संसाधन मंत्रालय व भारतीय द्यानपीठ कुलगुरु राय एवढेच दोषी!

महात्मा गांधीजीनी हिन्दी भाषेच्या प्रचार व प्रसारा साठी दिलेले योगदान लक्ष्यात घेवुन केंद्र सरकारने स्वातंत्र्य आंदोलनाच्या कालात गांधीजींचे दीर्घ काळ वास्तव्य असलेल्या वर्धा शहर परिसरात महात्मा गांधीच्या नावाने आंतरराष्ट्रीय हिन्दी विद्यापीठाची स्थापना केली। हे विद्यापीठ स्थापन होवून एक दशक उलटले असले तरी फारच थोडयाना या विद्यापीठाच्या अस्तित्वाची कल्पना होती। या विद्यापीठात हिन्दी माध्यमातून नेहमीच्या विषया व्यतिरिक्त गांधी तत्वद्यानाचे अध्ययन केल्या जाते हे सर्व सामान्याना माहित असण्याचे कारणच नाही. या विद्यापीठाचे कुलगुरु विभूति नारायण राय यानी उधललेल्या मुक्ताफलानी मात्र हे विद्यापीठ एका एकी प्रकाश झोतात आले आहे. त्यानी स्त्री लेखिका बद्दल काढलेल्या अतिशय हीन आणि असभ्य उदगारानी सारा देश स्तिमित आणि स्तंभित झाला आहे। या गृहस्थाचे हिंदी भाषे साठीचे अश्लील भाषा वापरण्या व्यतिरिक्त काय योगदान आहे याची मला कल्पना नाही.पण त्याने काढलेल्या उदगारा वरून एवढे मात्र जग जाहीर झाले आहे की गांधीजींच्या नावाने असलेल्या या विद्यापीठाच्या कुलगुरुला गांधी विचाराचा स्पर्श देखील
झालेला नाही.त्याच्या बेताल वक्तव्या वरून होत असलेली टिका योग्यच आहे आणि त्याला पदावरून काढून टाकण्याची मागणी देखील रास्त आहे.पण या गदारोलात दोन महत्वाच्या बाबीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.मूलत: महात्मा गांधीच्या नावावर सुरु असलेल्या या आंतरराष्ट्रीय विद्यापिठाच्या कुलगुरु पदी बसण्याची कोणतीही लायकी नसताना या गृहस्थाची कुलगुरु म्हणून नियुक्ती झालीच कशी हां प्रश्न कोणालाच पडू नये याचे नवल वाटते.अन्यथा या गृहस्थाची हकालपट्टी करण्या साठी साकडे घालन्या ऐवजी नालायक व्यक्तीची नियुक्ती केलीच कशी याचा जाब सम्बंधिताना विचारल्या गेला असता.अशा महत्वाच्या पदावर नियुक्ती करणारी आमची यंत्रणा किती सडलेली आणि कुचकामी आहे हे या निमित्ताने पुढे येवून सुद्धा ती यंत्रणा व त्यात सामील लोक सुरक्षीत आहेत आणि छाती फुगवून राय यांच्यावर कारवाई करण्याची भाषा बोलत आहेत। लोक क्षोभ ध्यानात घेवुन कारवाई करण्या एवढी संवेदनशील व प्रामाणिक यंत्रणा अस्तित्वात असती तर अशी नियुक्तीच झाली नसती.पण राय यांच्या जागी आपला दूसरा पिट्ठू बसविन्याची चालून आलेली संधी ही यंत्रणा सोडनार नाही व म्हणून राय जातील आणि दुसरे सवाई राय येतील!म्हनुनच राय यांच्या सोबतच त्याना नियुक्त करणारी यंत्रणाही तितकीच दोषी आणि चुकीची आहे हे लक्षात घेवुन कारवाईची मागणी होने गरजेचे आहे। या प्रकरणी केन्द्रीय मानव संसाधन मंत्रालयाच्या चुकीमूले महामहिम राष्ट्र्पतीना शरमेने मान खाली घालावी लागली आहे .कारण मंत्रालायाच्या शिफारशी आधारे महामहिम राष्ट्रपतीनी राय यांची कुलगुरु पदी नियुक्ती केली होती। राष्ट्रपती पदाची शोभा करणारे मानव संसाधन मंत्रालयातील कारभारी तसेच सुटू नयेत म्हणून पंतप्रधाना साकडे घालण्याची गरज आहे.
कुलगुरु राय यांच्यावरील संताप स्वाभाविक आणि समर्थनीय असला तरी संतापाच्या भरात या प्रकरणातील आणखी एक दोषी असलेली महत्वाची व प्रतिष्ठित अशी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार देणारी भारतीय द्यानपीठ संस्थाही सही सलामत सुटत आहे.याच संस्थे तर्फे प्रकाशित होत असलेल्या पत्रिकेने राय यांची वादग्रस्त मुलाखत घेतली आणि छापली होती.या मुलाखती मधील मजकुर एखाद्या सड़क छाप पीत पत्रिकेतही छापन्या सारखा नसताना भारतीय द्यानपीठाच्या अधिकृत पत्रिकेत कसा काय छापला गेला यावर गहजब व्हायला पाहिजे होता.स्त्रिया बद्दल विकृत द्रष्टिकोण असनारेच असा मजकुर छापू शकतात.या विरुद्ध पाहिजे तसा संताप व्यक्त होवू नए याचे आश्चर्य वाटते। साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार देणार्या संस्थेच्याच अधिकृत प्रकाशनात फ़क्त स्त्री लेखिकान्चीच नवे तर समस्त स्त्रियांची मानहानी करण्यात आल्याने पुरस्कार प्राप्त महनीय लेखिकानी व लेखकानी सुद्धा आपले पुरस्कार भारतीय द्यानपीठ संस्थेला परत करने आवश्यक होते। हीच मुलाखत अन्य प्रसिद्धी माध्यमात आली असती तर बेभान व बेजबाबदार पत्रकारिता म्हणून शंख केला गेला असता व मुलाखत प्रसिद्ध करणारे शिक्षे विना सुटले नसते। येथे तर साधी माफी मागावी असी मागणीही संबद्धित पत्रिके कड़े किंवा भारतीय द्यानपीठाकडे केल्याचे वाचनात नाही। मुलाखत प्रकाशीत करणारी पत्रिकाचे व्यवस्थापन आणि मालक असलेले द्यानपीठ एवढे संवेदनाशून्य निघाले की त्याना स्वत:हुन माफी मागण्याची गरज वाटली नाही.त्यांच्या या कृतीने द्यानपीठ पुरस्काराची सारी प्रतिष्ठा धुलिला मिळाली आहे.तेव्हा लोक क्षोभाचे चटके त्यानाही बसायालाच हवे.
दिल्ली येथे सार्क राष्ट्राचे एक विद्यापीठ कार्यरत आहे व बिहार मधील नालंदा येथे दुसरे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहे। पण वर्धा येथील महात्मा गांधी विद्यापीठ हे सध्या तरी देशाचे एकमेव आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे.या विद्यापीठाच्या कुलगुरुची ही अवस्था असेल तर अन्य विद्यापीठाचे कुलगुरु काय उजेड पाडीत असतील याचा विचार न केलेलाच बरा ! शिक्षण क्षेत्रातील विद्वानानी अंतर्मुख होवून कुलगुरु सारख्या पदा वर योग्य व्यक्ती कशी निवडल्या जाईल व त्या प्रक्रियेत सम्पूर्ण पारदर्शकता कशी राहील याचा विचार केला पाहिजे आणि राजकिय हस्तक्षेपातुन या पदाला मुक्त करण्यासाठी कंबर कसली पाहिजे ही आणखी एक महत्वाची बाब या प्रकरनाने अधोरेखित केली आहे।
--- सुधाकर जाधव

भ्रमण ध्वनी -9422168158

4 comments:

  1. mi sudhakar jadhav anchya matashi sahamat aahe.ase kulguru nemnyasathi jababdar vakti va lekh prakashit karnarya bhartiya dnyanpeeth chi suddha chaukashi houn jababdar vaktinvar karvai jhali pahije.

    ReplyDelete
  2. I agree with Shri Sudhakar Jadhav. Mr Rai is unfit to be a vice-chancellor of not just that Unibersity, but any university of India. To me, he is a ``political'' appointment without merit.

    ReplyDelete
  3. स्त्रियांबाबत वाट्टेल ते बोलण्याची, मित्रमंडळात बसलेले असताना घाणेरड्या शब्दांत स्त्रियांच्या चारित्र्यासंबंधी विनोद करण्याची आपली सांस्कृतिकता आहे. अवयवांचे संदर्भ तर चवीचवीने घोळवले जातात. हे राजकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, पत्रकारितेत, जरा खाजगीत होते.करमणूक क्षेत्रात निलाजरेपणाने खुले आम होते. कुलगुरूपदी बसलेल्या या निर्लज्ज माणसाच्या बेताल वक्तव्यामुळे तळाची घाण वर तरंगली इतकेच.पण त्याला त्या पदावर बसवणारांची, त्याच्यापुढे किंवा तसल्या अनेकांच्या पुढे लांगुलचालन करणाऱ्यांची सास्कृतिकता तीच आहे. कोणी कुणावर कारवाई केली तर आपली जाहीर अब्रू वाचल्यासारखी होईल... पण मुळातच आपल्यात घाण पुष्कळच आहे, हे सत्य काही त्यामुळे लपत नाही.

    ReplyDelete
  4. Sudhakar Jadhav tumcha jawab nahi

    ReplyDelete