Sunday, November 21, 2010

पत्रकारितेचे वस्त्रहरण

पत्रकारितेचे वस्त्रहरण
भारतीय समाजाला आदर्शाचे नेहमीच वेड आणि ओढ़ राहात आली आहे.कालौघात व्यक्ती आणि संस्था यांचे खरे खुरे आदर्श लोप पावत चालले तशी समाजाला काल्पनिक आदर्शाची गरज स्वाभाविक मानली पाहिजे.काही आदर्श समाजाने डोळे मिटून निर्माण केले (उदा.न्यायालायांचे न्यायाधीश ) तर काहीनी लोकांची गरज लक्षात घेवुन आदर्श विक्रीची दुकाने उघडली.यात सत्य साईबाबा , रामदेव बाबा , रविशंकर महाराज यांच्या सह आसाराम बापू सारख्या भामट्यानचा समावेश होतो.पर्यावरणवादी भामटे देखील याच प्रकारातले! पण स्वत:चे भामटेपन झाकून इतरांचे भामटेपन उघडा करणारा नवा वर्ग स्वातंत्र्या नंतर उदयाला आला.पण या वर्गाचा वारसा टिलक, गांधी आणि आम्बेडकरांचा असल्याने हां वर्ग लोकशाहीचा स्वयम्घोषित चौथा आधार स्तम्भ बनला!सुदैवाने आपली लोकशाही सर्व सामान्यानी आपल्या खांद्यावर पेलली असल्याने लोकशाही टिकून आहे आणि गाड़ी मागे चालनारा कुत्रा जसा गाड़ी आपणच चालवित आहोत अशी समजूत करून घेतो तसे लोकशाहीचे कथित आधारस्तंभ आपणच लोकशाहीचा गाडा चालवित असल्याचे भासवून समाजाला ठगवित् आले आहेत.पण लोकशाहीच्या अन्य कथित स्तंभाची ठगगिरी उघड करणारा लोकशाहीचा स्वयंघोषित स्तम्भ इतरा सारखाच ठग आहे हे मनमोहनसिंह सारख्या स्वच्छ प्रतिमेच्या पन्तप्रधानाना आरोपीच्या पिंजर्यात उभा करणार्या 2G स्पेक्ट्रम कान्डाने उघड केले आहे!प्रसार माध्यमात बोलला गेलेला वा छापल्या गेलेला शब्द खराच असला पाहिजे या समजुतीने प्रसार मध्यमांचा दबदबा वाढला .दीड ते दोन दशका पूर्वी प्रसार माध्यामांचे -प्रामुख्याने प्रिंट मेडिआचे -संचालन स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी व्यक्ती कडून होत असल्याने हां दबदबा स्वत:चे उखल पांढरे करण्यासाठी वापरण्या ऐवजी सामाजिक प्रश्नांच्या सोडावुनिकी साठी , अन्यायाच्या परिमार्जनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या गेला.आयातीत कागदाचा कोटा वाढवून मिळविने आणि वृत्तपत्राचे आर्थिक गणित सोडविन्यासाठी जाहिराती प्राप्त करने या पलीकडले त्यांची फारसी मजल गेली नाही.अर्थात अन्य क्षेत्रा प्रमाणे याही क्षेत्रात भामटे स्वातंत्र्य सैनिक शिरले आणि त्यानी या माध्यमातून सत्ता व सम्पत्ती मिळविली .महाराष्ट्रातील एक प्रमुख वृत्तपत्र समूह अशा गैर प्रकाराच मूर्तिमंत उदाहरण आहे। पण गेल्या दोन दशकात बहुतेक वृत्तपत्र याच गैर मार्गाने सता व संपत्तीची चव चाखु लागले आहेत.याच कालखंडात दृकश्राव्य माध्यमांचा उदय झाला आणि प्रसार माध्यम क्षेत्राचे चित्र आणि चरित्रच बदलले। वृत्तपत्र क्षेत्रात सगळे महत्त्व सम्पादकाचे असायचे.अपवादात्मक स्तम्भ लेखक वगलता अन्य पत्रकारांची पात्रता असली तरी समाजात व सत्तेच्या वर्तुलात स्थान दुय्यमच होते.पण दृक्श्राव्य माध्यमाने चित्रच बदलले !हे माध्यम जास्त खर्चिक असल्याने यात संपादका पेक्षा पैशेवाला मालक महत्वाचा बनला.पण वृत्तपत्राच्या सम्पादकाला जसे काय छापायाचे आणि काय नाही या संबंधी अधिकार गाजविन्याची ,नाक खुपसन्याची हौस असते ,तशी ती चैनेल मालकाला नसते! IBN सारखे अपवाद सोडले तर यात सम्पादकाचे महत्त्व कमी झाले .किम्बहुना तो दृक श्राव्य माध्यम असुनही अदृश्य स्वरूपात वावरू लागला आहे.दृश्य स्वरूपात बातम्या देणारे आणि विविध कार्यक्रमाचे ,चर्चांचे सूत्र संचालन करणारे पडद्यावर सतत वावरत असल्याने त्याना महत्त्व येवू लागले .यातील बरेच महानुभव आपल्या चातुर्याने (किंवा अधिक चपखल शब्द वापरायचा झाला तर आपल्या चतरे पनाने) सेलेब्रिटी बनले ! याना सत्ताधारींचे आणि कॉरपोरेट क्षेत्रातील दबंगाचे जसे आकर्षण होते तसेच आकर्षण स्वत: बद्दल निर्माण करण्यात टेलीवीजन चे माध्यम कामी आले.यांचा आपसातील संपर्क-संवाद वाढला। सताधारी वर्गाची प्रसिद्धीची हौस आणि भानगडीनचया अप्रसिद्धीची गरज प्रसिद्धी माध्यमातील हे नवे मित्र भागवू लागले.तर सत्ताधारीन्शी स्वस्तात सौदा पटविन्या साठी प्रसार माध्यमातील हे नवे दलाल कॉरपोरेट जायंट्स ना फायद्याचे वाटू लागले.बदल्यात कॉरपोरेट व सत्ताधारी वर्गाकडून माध्यम दलालान्च्या वाढत्या गरजा पूर्ण होवू लागल्या.शिवाय या दोन्ही क्षेत्रातील जाहिरातींचा ओघ वाढल्याने माध्यम मालक ही खुश!कॉरपोरेट जगत,सत्ताधारी समूह आणि प्रसार माध्यमातील सेलेब्रिटी यांचा एकमेकाना प्रचंड लाभ होत असल्याने यांची युती आणि आघाडी बनली आहे.आजच्या घडीला देशावर खरे राज्य या अभद्र युतीचे आहे.पंतप्रधान मनमोहन असले तरी त्यांच्या मंत्री मंडलात कोण असावे हे ठराविन्या इतकी ही युती शक्तीमान आहे.कोणते सरकारी कुरण कोणत्या कॉरपोरेट ला कोणत्या दरात द्यायचे याचा निर्णय हीच आघाडी घेणार!मंत्री मंडल त्यावर शिक्का मारण्याचे कारकुनी काम तेवढे करणार.मला स्वत:ला हे लिहिताना आपण अतिशयोक्ती करीत आहोत असे वाटते .पण नीरा रादिया या कॉरपोरेट दलाल ललनेचे आणि प्रसार माध्यमातील सेलेब्रिटी बरखा दत्त , वीर संघवी , प्रभु चावला इत्यादि इत्यादी महानुभवान्शी झालेल्या सम्भाशनाच्या ज्या ध्वनीफिती सार्वजनिक झाल्या आहेत त्या लक्षात घेता या पेक्षा वेगले लिहिणे हां सत्याचा विपर्यास होइल.राज्यकर्ते व उद्योग जगत आधीच नागवे झाले होते .नव्याने पत्रकार जगत तेवढे नागवे झाले.पण पत्रकार जगतातील आज ज्यांचे वस्त्रहरण झाले तेवढेच दोषी नाहीत.पत्रकार जगताची दोन दशका पासून सुरु असलेल्या घसरनीचे नेतृत्व करणारे बेगडी वस्त्र परिधान करून समाजात मानाने तर सत्ता वर्तुलात माजाने वावरत आहेत.पत्रकारितेचा गैर वापर करून यानी सत्ता स्थाने तर पटकाविलीच ,पण अमाप सम्पत्तिही जमाविली .सत्तेत असणारेच भूखंड माफिया नाहीत.वृत्तपत्र समुहाच्या नावाने यानी प्रत्येक शहरात करोडोचे भूखंड घशात घातले आहेत.आता तर भूखंड घशात घालन्या साठी नवी वृत्त पत्रे काढ़ने, जुन्यांचा विस्तार करने हां फायदेशीर धंदा बनला आहे.पदरमोड करून लोकांच्या समस्याना वाचा फोड़न्या साठी स्वत:च्या जागेत वा भाड्याच्या जागेत वृत्तपत्र काढन्याची कल्पना केव्हाच इतिहासजमा झाली आहे। पत्रकारितेचे अवमूल्यन करणारेच पत्रकार जगतातील सम्राट बनले आहेत.या सम्राटाना मागे टाकुन पुढे जाण्याची घाई बरखा दत्त व इतराना नडली असावी.या सम्राटा सारखे प्रचंड खावुन ही ढेकर न देण्याची कला अवगत न करताच खाल्याने सोन्या ऐवजी शेण खाण्याची वेळ बरखा दत्त आणि कम्पू वर आली आहे.उथल पाण्याला खलखलाट फार असे म्हणतात ते खोटे नसावे!पण त्यामुले अवघ्या पत्रकार जगताची मान शरमेने खाली गेली आहे। (समाप्त) -sudhakar jaadhav
pandharkawada,yavatmal. ssudhakarjadhav@gmail.com
मोबाइल-9422168158

4 comments:

  1. i wrote this on facebook about KUMAR KETKAR:
    उपाय सुचवा-हजार रुपये मिळवा !

    मित्रहो , लोकसत्ता दैनिकाचे सम्पादक कुमार केतकरान्च्या मानगुटीवर बसलेले लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे भुत उतरविन्यास मदत करा! जेव्हा-जेव्हा (ई.)गांधी घराण्याच्या किंवा केंद्र सरकारच्या चुकान्च्या समर्थनार्थ त्यांची लेखनी शाई सांडू लागते तेव्हा तेव्हा मोगलाना जसे धनाजी व् संताजी पाण्यात दिसत होते तसे जयप्रकाश व् आणिबाणी त्यांच्या नजरे समोर येवून ते सैरभैर होतात व् लेखनी भरकटते!
    ता.क.
    केतकराना लोकसत्तातुन नारळ देण्याचा उपाय सुचवू नये. कारण एक्सप्रेस समुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका हे जयप्रकाशजी चे कट्टर समर्थक व् आणिबानिचे घोर विरोधक असल्याने एक्सप्रेस समुहाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते.या कारणाने संतप्त गोएंका ...वारसदारानी जयप्रकाशजी व् रामनाथजी यांचा सूड उगविन्यासाठी कुमार केताकरांची नियुक्ती केली आहे!

    ReplyDelete
  2. Daniel Mazgaonkar to me



    प्रिय सुधाकर,

    फार छान लेख लिहिला आहेस.

    डेनियल
    "AB BHEE JISKA KHOON NA KHAULA HO VO KHOON NAHI PAANI HAI
    JO DESH KE KAAM NA AAYE VO BEKAR JAWANI HAI"

    अब भी जिसका खून ना खौला हो वो खून नाही पानी है
    जो देश के काम ना आये वो बेकार जवानी है.

    ReplyDelete
  3. Kumar Prashant to me



    Abhi desh se bahar hun. 1 december ko lautunga.
    patrakarita ka vasraharan - padha. Apani marathi bachhon jaisi hai phir bhi hav samjha leta hun. baat acchi tarah se ubhari hai. Badhai.
    Aapke aur maya ke Padhane ki liye apane yahan se likhe lekh bhejta hun.

    Regards, Kumar Prashant.

    ReplyDelete
  4. Sudhakar,
    Me 6 varshapurvi patrkarita sodnyachya vicharat hoto karan tyatil pholpana.Tyache swarup ani upyuktata badlata yeiel ka? ya vicharat Agrofocused vichar kela ani Agrijournalism madhye ramlo. Thode samadhan milalale. Pan shevti ti suddha patrakarita. Javu dya kon kitti khali jato ani vaprun gheto yachich spardha zaliy. tuzya bahutek muddyanshi sahmat aahech. anantrao yanche Jlanyala shevtache bhasan Hote Fourth Estate ka Nustich Estate? Te gele ani tyancha Marathwada suddha. Aata Aurangabad chi olakh 100 Mercedez ani BMW gadya ghenare shahar ashi zaliy. Ani tuza rokh aslelya Vruttapartachya Tarun Malkacha pudhakar aahe. 10 Percent madhye Ghare ghenare sarech aahet. Me Manohar Joshi chya kalat Malad cha arz n karata milalela flat vapas kela tevha kalale ki moh nakarne kitti avghad aste pan javu de. chlanarach. aapan aaple kam karayche.Nishikant

    ReplyDelete