"आधुनिक पद्धतीच्या शेतीतुन शेती खर्च वाढतो व् शेतकरी कर्ज बाजारी होतो आणि त्यातून शेतकरी आत्महत्या करतात हां या मंडळीचा आवडता सिद्धांत. या सिद्धान्ताने शेतकरी तेव्हाही कर्ज बाजारी होता हे सत्य झाकता येते.तेव्हाच्या कर्जबाजारी पणात व् आजच्या कर्जबाजारी पणात संख्यात्मक फरक असला तरी गुणात्मक फरक नव्हता हे सत्य या सिद्धांताच्या पोटात लापविता येते.सर्वात महत्वाचे म्हणजे हां सिद्धांत स्वीकारला की शेती मालाच्या भावाचा प्रश्न बाजुला टाकता येतो व् शेतकरी आत्महत्त्ये साठी शेतीमालाचे भाव नव्हे तर शेती करण्याची पद्धत जबाबदार असल्याची उर बडवेगिरी उजागिरिने करता येते."
सेंद्रिय शेती करी पर्यावरणाची माती
एके काळी स्वामी विवेकानंदाचे अवतार म्हणून चर्चेत असलेले हिवरा आश्रमाचे शुकदास महाराज आता संत म्हणून सर्व दूर परिचित आहेत.आश्रम परिसरातील शेती विषयक प्रयोगाने शेती तद्न्य म्हणून ही त्यांची ख्याती आहे.मात्र अध्यात्मिक क्षेत्रात त्याना गुरूस्थानी मानणारा शेतकरीही त्याना शेती क्षेत्रात गुरु मानायला तयार नसल्याचे त्यांच्या शेती विषयक ताज्या मागणी वरून स्पष्ट होते.शुकदास महाराजानी मुख्यमंत्र्याकडे केरळ च्या धर्तीवर जैविक शेतीचे धोरण स्वीकारुन कीटकनाशकाच्या उपलब्धतेवर निर्बंध लादावेत जेणे करून पर्यावरण व् जैवविविधता संकटात येणार नाही, अशी मागणी केली आहे.या पूर्वी महाराजानी बी टी वांग्याचा यशस्वी विरोध केल्याचाही त्या वृत्तात उल्लेख आहे. महाराज शेती विषयक जे बोलतात त्याचा सर्व साधारण शेताकर्यावर फारसा परिणाम होणार नसला तरी सरकारच्या धोरण विषयक निर्णयावर प्रभाव टाकण्यासाठी किंवा आपले घोड़े पुढे दामटन्यासाठी शेतीचे अद्न्यानी अभ्यासक व कथित पर्यावरण प्रेमी यांच्या हाती आयते कोलीत मिळनार असल्याने महाराजांच्या म्हनन्यातील तथ्य तपासून पाहण्याची गरज आहे.
प्रत्येक संताचे लोक प्रबोधन हे अंगीकृत कार्य असते.राज्यकर्त्याना द्न्यान देण्यासाठी त्यांचा जन्म नसतो.राज्यकर्ते सल्ला आणि आशिर्वादासाठी आलेच तर शिष्टाचार म्हणून सल्ला व आशिर्वाद देतात इतकेच.पण कीटक नाशकाच्या वाढत्या वापराने शेतकरी पर्यावरण व विविध जीव जन्तुन्चा नाश करीत असल्याने परिस्थितीचे गाम्भीर्य लक्षात घेवुन महाराजानी मुख्यमंत्र्याकडे धाव घेतली असे त्याचे समर्थन त्यांचे समर्थक नक्कीच करतील.पर्यावरण विनाशाची काळजी महाराजानी करायची नाही तर कोणी करायची असे कोणी म्हटले तर त्यातही काही चुक नाही.चुक दिसते ती एवढीच आहे की,महाराजांचे शेती विषयक प्रयोग बघून परिसरातील व आश्रमात दूर-दुरून येणारे शेतकरी यांचे डोळे का दिपले नाहीत याचा विचार महाराजाना करावासा वाटला नाही.लाखो नाही तरी आश्रमाच्या आजुबाजुच्या गावातील हजारो एकर शेती महाराजांच्या शेती प्रयोगाने प्रभावित होवून सेंद्रिय पद्धतीने फुलायाला हरकत नव्हती. तसे घडले नाही याचे कारण अगदी सरळ आणि उघड आहे.महाराजान्पेक्षा सर्वसाधारण शेतकरी जास्त अनुभवी आहे.पिढ्या न पिढ्यांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे.संकरित बियाने ,रासायनिक खते व कीटक नाशके यांचा भारतीय शेतीत प्रवेश आणि प्रयोग होण्या आधी आपल्याकडे सेंद्रिय शेतीच केल्या जायची-अगदी नेहरु-शास्त्री युगा पर्यंत म्हणजे १९६० च्या दशकाच्या मद्ध्या पर्यंत. त्या नंतर कथित हरित क्रांती आली.सेंद्रिय शेतीची हरित क्रांती कड़े झालेली वाटचाल पाहणारी व प्रत्यक्ष या दोन्ही प्रकारच्या शेतीचा अनुभव घेणारी पीढी आज ही हयात आहे आणि वृद्ध असली तरी नाईलाजाने शेतीच करीत आहे. सेंद्रिय शेतीतुन सर्वच प्रकारच्या अभावाचे जे चटके या पिढीने सहन केले आहेत ते बघता कोनाचीच मागे जाण्याची तयारी नाही हे शुकदास महाराजासह सर्वच सेंद्रिय शेती समर्थक व पर्यावरण वादी लक्षात घेत नाहीत. आधुनिक पद्धतीच्या शेतीतुन शेती खर्च वाढतो व् शेतकरी कर्ज बाजारी होतो आणि त्यातून शेतकरी आत्महत्या करतात हां या मंडळीचा आवडता सिद्धांत. या सिद्धान्ताने शेतकरी तेव्हाही कर्ज बाजारी होता हे सत्य झाकता येते.तेव्हाच्या कर्जबाजारी पणात व् आजच्या कर्जबाजारी पणात संख्यात्मक फरक असला तरी गुणात्मक फरक नव्हता हे सत्य या सिद्धांताच्या पोटात लापविता येते.सर्वात महत्वाचे म्हणजे हां सिद्धांत स्वीकारला की शेती मालाच्या भावाचा प्रश्न बाजुला टाकता येतो व् शेतकरी आत्महत्त्ये साठी शेतीमालाचे भाव नव्हे तर शेती करण्याची पद्धत जबाबदार असल्याची उर बडवेगिरी उजागिरिने करता येते. आज सेंद्रिय शेतीचे कौतुक प्रसिद्धी माध्यमातून होत असले , यातून मिळनार्या खर्या-खोट्या नफ्यांची वर्णने प्रसिद्ध होत असली व सर्व पर्यावरण वादी अशा शेतीचे गोडवे गात असले तरी शेतकरी तिकडे वळत नाही याचे कारण या शेतीचा त्यांच्या पाठीशी असलेला दांडगा पण वाईट अनुभव आहे. आज सेंद्रिय शेती करणारे आणि सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार करणारे या पैकी कोणाचेही पोट शेतीवर अवलंबून नाही.शेती हां काही त्यांच्या उपजिविके साठीचा अपरिहार्य असा धंदा नाही. असलाच तर निर्याती वर डोळा ठेवून केलेला तो जोड़धंदा आहे. सेंद्रिय शेतीतुन उपजलेला अभाव फ़क्त शेतकरी कुटुम्बा पुरताच मर्यादित नव्हता.तेव्हाचे अन्न संकट सम्पूर्ण देशाने अनुभवले आहे.अमेरिकेत पशु खाद्य म्हणूनही वापरले जाणार नाही असे धान्य आयात करून या देशाला गुजरान करावी लागली आहे.भूक बळी हे तेव्हाचे दाहक वास्तव होते.शेती वर अवलंबून असलेली शेतकरी-शेतमजुरांची कुटुम्बे तर वर्षानुवर्षे अर्ध पोटी राहिली आहेत.शेतीवर अवलंबून असलेल्यान्चाच नाही तर सम्पूर्ण देशाची उपासमारीतुन सुटका केवळ हरित क्रांतीने झाली हे विसरून चालणार नाही.स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या आजच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थान्शही नव्हती आणि औद्योगीकरण व नागरीकरण कमी असल्याने शेती क्षेत्र आजच्या पेक्षा अधिक होते.या स्थितीत सुद्धा परम्परागत बियाने व काडी-कचरा , पाला-पाचोला व शेणख़त यांच्या सहाय्याने केलेली शेती देशाची अन्न-धान्याची गरज भागवू शकत नव्हती.मग पुन्हा मागे जावून आम्ही सव्वाशे कोटी लोकसंख्येचे पोट कसे भरणार आहोत? संकरित बियाने,रासायनिक खते व कीटकनाशके यांची शेतीमाल उत्पादन वृद्धी साठीची परिणामकारकता कमी होत चालली आहे व त्याचे शुकदास महाराज व नेहमीचे पर्यावरणवादी कलाकार म्हणतात त्याप्रमाणे त्याचे दुष्परिणाम होत आहेत हे अगदी खरे आहे.याचा अति वापर हे जसे त्याचे एक कारण आहे ,तसेच ६० च्या दशकात आपल्या शेतीत आलेले हे तंत्रद्न्यान संशोधनातून आणि अनुभवातून अधिक प्रगत करण्याचा व या तंत्रद्न्यानाची उपयुक्तता संपूस्टात येत असल्याचे लक्षात आल्यावर नवे तंत्रद्न्यान स्वीकार व आत्मसात करण्याची मानसिकता तयार करण्यात येत असलेले अड़थले हे दुसरे महत्वाचे कारण आहे. शुकदास महाराजांच्या प्रयत्नांचा व मागणीचा असाच परिणाम होणार आहे. संशोधनाचे तर आमच्या देशाला वावडे आहे असे वाटण्या सारखी परिस्थिती आहे.कधी काळी आमच्याकड़े शुन्याचे संशोधन झाले होते , त्या संशोधनाचा उपयोग आम्ही संशोधनाच्या बाबतीत शून्य आहोत हे दर्शाविन्यासाठीच होतो! आमच्याकडे शेती पासून ते सरक्षणसिद्धी साठी जेवढ्या म्हणून संशोधन संस्था आहेत त्या पांढरे हत्ती म्हणून आम्ही पोसतो आहोत.दुसर्याचे संशोधन चोरून आपल्या नावावर खपविन्यात आमच्या संशोधकाची सगळी प्रतिभा खर्च होते! हरित क्रांतीचे जे तन्त्रद्न्यान आमच्याकडे आले ते याच मार्गाने! या संशोधनावर आपला हक्क सांगुन मानमरातब,पुरस्कार व पदे मिळविनारे आता शेतीत नवे तंत्रद्न्यान येवू नये म्हणून जिवाचा आटापिटा करीत आहेत. त्यांच्या नावावर जमा असलेले हे संशोधन इतिहास जमा झाले तर त्यांचे नाव ही इतिहास जमा होइल ही भीती त्याना वाटतअसावी!अन्यथा खराखुरा संशोधक नव्या संशोधनाचा विरोध कसा करील?कीटकनाशकाचे दुस्परिनाम दिसू लागल्यावर कीटकनाशकाची आवश्यकता संपूस्टात आणणारे बी टी तंत्रद्न्यान नाकारन्याचे कारणच नाही.पण पर्यावरण रक्षनाच्या गोंडस नावावर हे सगळे केले जात आहे. एक वस्तुस्थिती मात्र पर्यावरणवादी कधीच समोर येवू देत नाहीत.ही वस्तुस्थिती समोर आली तर अनेकाना भोवळ येण्याची शक्यता आहे.माणसाचे पर्यावरण विरोधी पडलेले पाहिले पाउल म्हणजे शेती करण्याचा प्रारम्भ हे आहे-औद्योगीकरण व नव-नवे तंत्रद्न्यान व संशोधन नव्हे!वैद्न्यानिक कसोटी लावून विचार केला तर आधुनिक पद्धतीच्या शेती पेक्षा पारम्पारिक किंवा सेंद्रिय शेती तुलनेने जास्त पर्यावरण विरोधी आहे हे दिसून येइल.एवढेच नव्हे तर आज परवलीचा शब्द बनलेल्या ग्लोबल वार्मिंग ला उद्योगापेक्षा शेती जास्त कारणीभूत आहे हे सत्य स्विकारायला जड़ असले तरी तेच वैद्न्यानिक सत्य आहे.जगात औद्योगिकरनाने वेग घेतल्या पासून म्हणजे सुमारे १५० वर्षा पासून पर्यावरणाचा तोल बिघडविनारे व पृथ्वीचे तापमान वाढविणारे जे वायु मानवी कृतीतुन उत्सर्गित होत आलेत त्याच्या वैद्न्यानिक अभ्यासाचे निष्कर्ष काय सांगतात? या अभ्यासानुसार गेल्या १५० वर्षात औद्योगिकरनामुले वातावरनातीलकार्बन डाय ओक्साइड चे प्रमाण ३१% ने वाढले आहे , तर शेती व शेतीशी संबद्धित जनावरे यातून गेल्या १५० वर्षात वातावरनातील मीथेन वायुत थोड़ी थिडकी नाही तर १५१% वृद्धी झाली आहे! काडी कचरा कुजने व शेण व त्यापासून ख़त तयार होण्याच्या क्रियेतुन मीथेन वायु वातावरणात सोडल्या जातो.भात शेतीतुन अधिक प्रमाणात मीथेन बाहेर पडतो. कोळसा,नैसर्गिक वायु व तेल यांच्या ज्वलनातुन ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेत कर्ब वायु वातावरणात जातो.हे वायु उस्णता धरून ठेवतात म्हणून तापमानात वृद्धी होत असते. शेतीतुन वातावरणात जाणारा मीथेन वायु हां औद्योगिकरनातुन वातावरणात सोडल्या जाणार्या कार्बन वायु पेक्षा ३१ पट अधिक उस्नता धरून ठेवतो.हां वैद्न्यानिक निष्कर्ष शेतीच्या व विशेषत: सेंद्रिय शेतीच्या विरोधात जाणारा आहे.औद्योगिकरनाद्वारे वातावरणात सोडला जाणारा मानव निर्मित कार्बन वायु झाडांचे,जंगलांचे संरक्षण व् संवर्धन केले तर ऑक्सिजन मधे परावर्तित होत राहतो,पण शेतीतून निर्माण होणारा , शेण,काड़ी-कचरा यांच्या कुजन्यातुन निर्माण होणारा मीथेन वायु वातावरणात तसाच राहून पर्यावरनाला हानी पोचविन्याचे काम करीत राहतो.याचा अर्थ सेंद्रिय शेती म्हणजे केवळ उपासमारीलाच निमंत्रण नाही तर पर्यावरनाला सुद्धा घातक आहे.म्हनुनच शुकदास महाराजानी पर्यावरनाला हानी पोचविनारा सेंद्रिय शेतीचा उद्योग सोडून शेतीत आधुनिक तंत्रद्न्यान आनन्यासाठी प्रयत्न केला तर महाराजाचे भक्त बनन्यात शेतकरी भावा-बहिणीना धन्यता वाटेल. (समाप्त) --------सुधाकर जाधव
पांढरकवडा, जि.यवतमाळ ssudhakarjadhav@gmail.com मोबाइल न.9422168158
Grand one.
ReplyDelete100% agreement.
The neo-terrorists intellectuals are fantastic.
The farmer was ridiculed as ADANI when he did not use organic fertilizers few years back and now he is ridiculed by these neo terrorists as ADANI because he now uses the same.
Dr Arun Gadre
पर्यावरणवाद्यांच्या तत्वज्ञानाची पार सालटीच काढलीत की हो तुम्ही.
ReplyDeleteEarlier methane, carbon di oxide and nitrous oxide were treated as green house gases. But today scientists came to the common consensus that the main culprit is carbon di oxide.
ReplyDeleteसन्मानीय सुधाकर जाधव साहेब,
ReplyDeleteआपला ब्लॉग सविस्तर वाचला. आपले विचारही काळजीपूर्वक वाचण्यात आले. त्याबाबत मानवहितकारी संत शुकदास महाराजांना अवगत करून देण्यात आले आहे. महाराजांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे जी मागणी केली आहे, त्याबाबतची बातमी आपण वृत्तपत्रांतून वाचली असेल. या बातमीत काय नमूद आहे, ते आपण काळजीपूर्वक वाचलेले दिसत नाहीत. रासायनीक शेतीने पर्यावरण धोक्यात येते, हा मुद्दा महाराजांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडला असून, कीटकनाशकांचा मानवी शरीरावर तसेच जैवविविधतेवर घातक परिणाम होत असल्याचे महाराजांनी मुख्यमंत्र्यांना साधार कळविले आहे. महाराज स्वतः ऍलोपॅथीचे प्रॅक्टीशनर असून, गत 48 वर्षात त्यांनी 100 लक्ष म्हणजे एक कोटी रुग्णांना व्याधीमुक्त केले आहे. इयत्ता चौथा वर्ग शिकलेला एक व्यक्ती हे काम कसे करू शकतो, हे विज्ञानासाठी आव्हान असले तरी त्याला महाराजांची प्रगल्भ बुद्धिमत्ता म्हणून त्यातील अंधश्रध्देचा भाग टाळूया. या बातमीत आणि महाराजांच्या पत्रात स्पष्ट नमूद आहे, की केरळ सरकारच्या धर्तीवर शेतीसाठीदेखील कृषितज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच कीटकनाशके किंवा खते वापरणे सक्तीचे करावे, अशी मागणी महाराजांनी केली आहे. म्हणजेच, मानवाला रोग झाल्यानंतर ज्याप्रमाणे रुग्णांवर डॉक्टर योग्य तो औषधोपचार करतो, त्याप्रमाणे संबंधित कृषितज्ज्ञ त्या पिकांवर, संबंधित शेतीच्या मातीवर औषधोपचार करेल, व योग्य त्या ठिकाणीच रासायनिक औषधांचा वापर होईल. अनिर्बंध रासायनिक शेती करून पर्यावरण व मानवीय जीवन धोक्यात येणार नाही. महाराज हे स्वतः उत्तम शेतकरी असून, आश्रमाच्या मालकीची अडीचशे एकर शेती त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली केल्या जाते. ही सर्व शेती रसायनेमुक्त असून, भरघोस पीक उत्पादन घेतले जाते. शिवाय, महाराजांनी ज्वारी, मूग, सोयाबीन आणि अलिकडे ख्यातकीर्त झालेले बासमती गहू हे कमी खर्च, पाणी आणि ग्लोबल वार्मिंगचा कोणताही परिणाम न होणारे वाण संशोधित केलेले आहे. परिसरातील सर्व शेतकरी सर्वच हंगामात महाराजांकडून मोफत कृषिसल्ला घेतात. आश्रमाकडे असलेल्या कृषी महाविद्यालयांतून माती, पाणी व पीकांचे मोफत परिक्षण करून संबंधितांना योग्य सल्ला दिल्या जातो. केवळ महाराजांबद्दल ब्लॉगवर काही तरी चुकीचे लिहिण्यापेक्षा आणि नेटीझन्सचा बुद्धिभ्रम केल्यापेक्षा महाराजांचे कार्य प्रत्यक्ष जवळून पाहावे, ही विनंती आहे.
- आपलाच,
पुरुषोत्तम सांगळे,
जनसंपर्क अधिकारी,
विवेकानंद आश्रम, ता. मेहकर, जि. बुलडाणा.
(8888822988)