कोपर्डी घटनेच्या वेदनेपेक्षा मराठा समाजाचा मानभंग होत असल्याची सल रस्त्यावर उतरविण्यास बाध्य करीत आहे. ही सल एका दिवसात किंवा एका घटनेने निर्माण झालेली नाही. स्वत:ला मर्द मराठा समजणाऱ्या या समाजाला मानभंगाच्या शल्याने एवढे हळवे केले आहे की क्षुल्लक आणि संबंधित नसलेल्या गोष्टीनी आणि घटनांनी त्याला अपमानित झाल्या सारखे वाटत आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
कोपर्डी घटनेनंतर मराठा (अर्थात कुणब्यासह) समाज जागा आणि संघटीत होताना दिसत आहे. औरंगाबादच्या अभूतपूर्व मोर्चाने याचे दर्शन घडविले.त्यानंतर असे मोर्चे आणखी काही ठिकाणी निघाले आहेत. सर्वात ताजा बीडचा मोर्चाही लक्षणीय आर्णि त्या समाजाची शक्ती दर्शविणारा होता. कोपर्डी घटनेवर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने कारवाई केली आणि त्यांच्या गतीने आरोपींना पकडले . त्यामुळे कोपर्डी घटनेवर काही कारवाई झाली नाही म्हणून मराठा समाज रस्त्यावर उतरला असे म्हणता येणार नाही. किशोरवयीन मुलीवर ज्या क्रूर पद्धतीने अत्याचार झालेत त्यामुळे कोणालाही वेदना झाल्या असत्या. त्या वेदनांनी समाजाला रस्त्यावर आणले हे पूर्ण सत्य नाही. त्या वेदनांनी समाजाला एकत्र आणले असे म्हणता येईल. कोपर्डीच्या वेदनेने एकत्र आलेला हा समाज रस्त्यावर उतरला आणि उतरत आहे ते केवळ त्या घटनेचा निषेध म्हणून नाही. कोपर्डी घटनेच्या वेदनेपेक्षा मराठा समाजाचा मानभंग होत असल्याची सल रस्त्यावर उतरविण्यास बाध्य करीत आहेत. ही सल एका दिवसात किंवा एका घटनेने निर्माण झालेली नाही. स्वत:ला मर्द मराठा समजणाऱ्या या समाजाला मानभंगाच्या शल्याने एवढे हळवे केले आहे की क्षुल्लक आणि संबंधित नसलेल्या गोष्टीनी आणि घटनांनी त्याला अपमानित झाल्या सारखे वाटते . मुद्दामहून आपल्याला डिवचण्यात येत आहे किंवा लक्ष्य करण्यात येत आहे अशा समजुतीने हा समाज क्रोधीत होवू लागला आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर 'सैराट' चित्रपटाचे देता येईल. समाजात जे घडते तेच चित्रपटात दाखविले आहे. नायिका दुसऱ्या कोणत्याही वरच्या जातीतील असती तरी हेच घडले असते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे यथार्थ चित्रण व्हावे या हेतून दिग्दर्शकाने नायिका मराठा समाजातील दाखविली असेल. नायिका ब्राम्हण समाजाची दाखविता येत नाही कारण हा समाज आता खेड्यात फारसा दिसत नाही.ब्राम्हण समाज आंतरजातीय विवाहाला इतर समाजाप्रमाणेच अनुकूल नसला तरी इतर समाजा इतका टोकाचा किंवा हिंसक विरोध कधीच करीत नाही. त्यामुळे कथानकाची गरज म्हणून दर्शविलेली मराठा समाजाची नायिका केवळ आपला मानभंग करण्यासाठीच निवडली आहे अशा समजुतीने देखील हा समाज दु:खी होण्या इतका हळवा झाला आहे. कोपर्डी घटनेच्या आधी त्याच म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात दलित स्त्रियांवर बलत्कार झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या घटनांसाठी सगळ्या मराठा समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात आल्याच्या भावनेने मनात राग साचलेला होताच. कोपर्डी घटनेने हा राग बाहेर काढण्याची आणि पलटवार करण्याची संधी मिळाली. कोपर्डी घटनेनंतर मराठा समाजाच्या मोर्चातून ज्या मागण्या समोर येताना दिसताहेत त्या बघता कोपर्डी घटनेच्या निमित्ताने वेगवेगळ्या कारणांनी समाजात व्याप्त खदखद , असंतोष आणि निराशा बाहेर येत आहे असे म्हणता येईल.
शेती करतात ते सगळेच मराठा नसतात, पण सगळे मराठा शेती करतात हे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. या शेतीनेच या समाजा समोर सगळे प्रश्न निर्माण केले आहेत. आर्थिक दुरावस्था आणि सरंजामी मानसिकता ही शेतीची पैदास आहे. एके काळी शेती शिवाय उत्पादनाची नि उत्पन्नाची दुसरी साधने नव्हती तेव्हा हा वर्ग समाजाचा पोशिंदा होता. बारा बलुतेदार त्याच्या दारी येत. त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर समाजाच्या तुलनेने तो सुखी होता. शेतीशिवाय उत्पादनाची अन्य साधने निर्माण झालीत तेव्हा शेती नसलेला समुदाय पटकन तिकडे वळला आणि शेतीतले तुलनात्मक सुख खरे मानून मराठा समाज शेतीतच अडकून पडला. शेती हे त्याच्या पायातील आणि प्रगतीतील बेडी कधी बनली त्याला कळलेच नाही. शेतीच्या बळावर म्हणा की लुटीवर म्हणा समाजाची प्रगती झाली , देशाची प्रगती झाली . शेतीत राबणारा तिथेच राहिला. शेती पासून लांब गेल्याने बारा बलुतेदार देखील सुखाने आणि मानाने जगू लागले. जे आपले एकेकाळी आश्रित होते , आपल्यावर अवलंबून होते ते आपल्याकडे ढुंकून पाहत नाहीत . मजेत राहतात , आपण मात्र अधिकाधिक दु:खाच्या गर्तेत चाललो आहोत हे या समाजाचे मोठे दुखणे आहे. पण या दु:खाचे मूळ दुसरे समाज घटक नाहीत . त्याचे शेतीत अडकून पडणे आहे हे त्याला लवकर कळलेच नाही. जेव्हा कळले तेव्हा बाहेर जाण्याचा मार्ग सापडत नसल्याने त्याची तडफड होत आहे. त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसे शेती बाहेर पडण्यासाठी आरक्षणाच्या काडीचा आधार मराठा समाजातील तरुण घेवू पाहत आहेत. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मान्य झाली तरी त्याचा फायदा किती टक्के लोकांना होणार आहे ? तुम्ही जर शालांत परीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची समाजनिहाय संख्या काढायला गेलात तर लक्षात येईल की शेतीशी निगडीत जो समाज आहे त्या समाजात अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. किती शेतकरी आपल्या मुलीना उच्च शिक्षण घेवू देतात ? मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक असले तरी शेतकरी समाजातील मुलीना उच्चशिक्षण सुलभ आणि सोपे नाही. मग आरक्षण मिळाले तरी यांचा काय फायदा होणार याचा विचार कोणी करीत नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मृगजळा मागे लागण्यापेक्षा शेती क्षेत्राचा कायापालट कसा होईल याचा विचार आणि त्यासाठीची कृती मराठा समाजासाठी निर्णायक ठरणार आहे. सर्वांगीण प्रगतीसाठी शेती बाहेर पडावेच लागणार आहे , पण शेती फायद्याची झाल्याशिवाय शेती बाहेर पडता येणार नाही असा हा चक्रव्यूह आहे. औरंगाबाद आणि बीडच्या मोर्चात सामील मराठा तरुणांमध्ये हा चक्रव्यूह भेदणारे अर्जुन असतील तरच या समाजासाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या होवू शकतील. अन्यथा भिक्षुक आमच्यावर राज्य करतात आणि ज्यांची जागा आमच्या पायाशी होती ते छाती पुढे करून डोळे वर करून आमच्याकडे बघतात या सरंजामी मानसिकतेने पिडीत हा समाज शेतीत टाचा घासत संपून जाईल.
------------------------------ ------------------------------ ----------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------ ------------------------------ -----------------------

महाराष्ट्रात इतर कोणत्याही जाती-जमाती पेक्षा मराठा समाज संख्येने मोठा आहे आणि संख्येच्या तुलनेत त्याचे अधिकार क्षेत्र त्यापेक्षा मोठे आहे ! काही वर्षापूर्वी डॉ. बाबा आढाव यांनी उपस्थित केलेला वाद आठवत असेल तर मी काय म्हणतो हे लक्षात येईल. ३५ टक्के समाजाने प्रदेशातील जवळपास सर्वच सत्ताकेंद्रे आपल्या ताब्यात ठेवली आहेत असे बाबा आढाव यांनी दाखवून दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विविध सामाजिक घटकात सत्ता जेवढी विभागली केली होती तेवढी देखील सत्तेची विभागणी आधुनिक महाराष्ट्रात झाली नव्हती. त्यामुळे दीर्घकाळ एकहाती सत्ताकेंद्रे ताब्यात ठेवणारा समाज असा रस्त्यावर येणे हे आश्चर्यच आहे. कमी संख्येने आणि अत्यल्प सत्ता केंद्रे हाती असलेल्या इतर समाजांनी किंवा जातींनी मोठ्या संख्येतील या समाजाची दुरावस्था केली असेल असे मानणे तर्काला आणि वस्तुस्थितीला धरून होणार नाही. एकमात्र खरे की आजवर संख्या, सत्ता आणि आर्थिक बळावर हुकुमत गाजविणाऱ्या या समाजाच्या हातातून सगळे निसटून चालले आहे. निसटून चालले आहे हे तर स्पष्ट दिसायला लागले आहे , पण या मागची कारणे या समाजातील तरुणांना लक्षात येत नसल्याने तो सैरभर झाला आहे. म्हणून ज्या मुद्द्यांवर व ज्या मागण्यांवर तो हिरीरीने आणि पोटतीडीकीने बोलतो ते वड्याचे तेल वांग्यावर काढण्या सारखे आहे हे त्याला कळत नाही. ज्यांच्या हाती नेतृत्व आहे त्यांना ते कळू द्यायचे नाही. कारण नेतृत्वाने या संख्या बळावर जी सत्ता काबीज केली होती ती सत्ता या समाजाचे दु:ख आणि दैना दूर करण्यासाठी वापरलीच नाही. या समाजाच्या सगळ्या दु:ख आणि दैनेचे मूळ शेती आणि शेतीशी निगडीत सरंजामी आणि मागासलेली मानसिकता आहे हे सत्य मांडण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न होतच नाही. त्यामुळे आरक्षण आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा या सारखे प्रश्न या समाजाचे जीवन - मरणाचे प्रश्न बनतात. आपल्या समाजातील तरुणांचा रोष असा दुसऱ्या समाजाकडे वळवून दिला की नेतृत्व सुखाने झोपू शकते ! राजकीय दृष्ट्या दुसऱ्या समाजाचा रोष परवडणारा नसल्याने नेतृत्व पडद्यामागे राहणे पसंत करते. आणि मग यालाच स्वयंस्फूर्त उठाव वगैरे म्हणून मराठा तरुण आपली पाठ थोपटून घेतो. हा जर स्वयंस्फूर्त उठाव असता तर या उठावाचा पहिला बळी त्या समाजाचे आजचे प्रस्थापित नेतृत्व ठरले असते. पण तसे झाले नाही . नेतृत्व सुरक्षित आहे . एवढेच नाही तर समोर न येता तरुणांचा रोष भलतीकडे वळविण्यात देखील नेतृत्व यशस्वी झाले आहे. पुन्हा एकदा मराठा तरुणांची दिशाभूल होत आहे. आपली लढाई इतर समाज घटकाशी नाही , आपल्या नेतृत्वाशीही नाही तर आपल्याशीच आहे हे मराठा तरुण समजून घेत नाही तो पर्यंत त्याला उन्नतीचा आणि प्रगतीचा मार्ग सापडणार नाही. आरक्षण हा आपल्या प्रगतीचा मार्ग नाही हे ज्या दिवशी त्याला उमगेल त्या दिवशी त्याला प्रगतीपथावर जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.
शेती करतात ते सगळेच मराठा नसतात, पण सगळे मराठा शेती करतात हे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. या शेतीनेच या समाजा समोर सगळे प्रश्न निर्माण केले आहेत. आर्थिक दुरावस्था आणि सरंजामी मानसिकता ही शेतीची पैदास आहे. एके काळी शेती शिवाय उत्पादनाची नि उत्पन्नाची दुसरी साधने नव्हती तेव्हा हा वर्ग समाजाचा पोशिंदा होता. बारा बलुतेदार त्याच्या दारी येत. त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर समाजाच्या तुलनेने तो सुखी होता. शेतीशिवाय उत्पादनाची अन्य साधने निर्माण झालीत तेव्हा शेती नसलेला समुदाय पटकन तिकडे वळला आणि शेतीतले तुलनात्मक सुख खरे मानून मराठा समाज शेतीतच अडकून पडला. शेती हे त्याच्या पायातील आणि प्रगतीतील बेडी कधी बनली त्याला कळलेच नाही. शेतीच्या बळावर म्हणा की लुटीवर म्हणा समाजाची प्रगती झाली , देशाची प्रगती झाली . शेतीत राबणारा तिथेच राहिला. शेती पासून लांब गेल्याने बारा बलुतेदार देखील सुखाने आणि मानाने जगू लागले. जे आपले एकेकाळी आश्रित होते , आपल्यावर अवलंबून होते ते आपल्याकडे ढुंकून पाहत नाहीत . मजेत राहतात , आपण मात्र अधिकाधिक दु:खाच्या गर्तेत चाललो आहोत हे या समाजाचे मोठे दुखणे आहे. पण या दु:खाचे मूळ दुसरे समाज घटक नाहीत . त्याचे शेतीत अडकून पडणे आहे हे त्याला लवकर कळलेच नाही. जेव्हा कळले तेव्हा बाहेर जाण्याचा मार्ग सापडत नसल्याने त्याची तडफड होत आहे. त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसे शेती बाहेर पडण्यासाठी आरक्षणाच्या काडीचा आधार मराठा समाजातील तरुण घेवू पाहत आहेत. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मान्य झाली तरी त्याचा फायदा किती टक्के लोकांना होणार आहे ? तुम्ही जर शालांत परीक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची समाजनिहाय संख्या काढायला गेलात तर लक्षात येईल की शेतीशी निगडीत जो समाज आहे त्या समाजात अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. किती शेतकरी आपल्या मुलीना उच्च शिक्षण घेवू देतात ? मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक असले तरी शेतकरी समाजातील मुलीना उच्चशिक्षण सुलभ आणि सोपे नाही. मग आरक्षण मिळाले तरी यांचा काय फायदा होणार याचा विचार कोणी करीत नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मृगजळा मागे लागण्यापेक्षा शेती क्षेत्राचा कायापालट कसा होईल याचा विचार आणि त्यासाठीची कृती मराठा समाजासाठी निर्णायक ठरणार आहे. सर्वांगीण प्रगतीसाठी शेती बाहेर पडावेच लागणार आहे , पण शेती फायद्याची झाल्याशिवाय शेती बाहेर पडता येणार नाही असा हा चक्रव्यूह आहे. औरंगाबाद आणि बीडच्या मोर्चात सामील मराठा तरुणांमध्ये हा चक्रव्यूह भेदणारे अर्जुन असतील तरच या समाजासाठी प्रगतीच्या वाटा मोकळ्या होवू शकतील. अन्यथा भिक्षुक आमच्यावर राज्य करतात आणि ज्यांची जागा आमच्या पायाशी होती ते छाती पुढे करून डोळे वर करून आमच्याकडे बघतात या सरंजामी मानसिकतेने पिडीत हा समाज शेतीत टाचा घासत संपून जाईल.
------------------------------
सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल - ९४२२१६८१५८
------------------------------
लाजवाब लेख आहे।
ReplyDeleteखूप छान सर...प्रत्येक मराठा तरूनांपर्यंत हे विचार जावेत तरच बदल घडतील..तुम्ही तर चुप्या चोरांना उघड पाडलयं...मराठी तरूनांना माझ अहवान असेल हा महाराष्ट्र छत्रपती महाराजांचा आहे त्यांचा आदर आमच्या अंतकरणात आहे. पण तरूण मराठयानो तुम्ही असा सवाल करू नका की हा महारष्ट्र फुले,शाहू,आंबेडकरांचाच...आमच्या फुले,शाहू,आंबेडकरांनी महाराजांचा खरा आर्दश त्यांच्या कृतीतून आम्हाला दिलाय....
Deleteसर आपले विश्लेषण फार संतुलित असते परंतु आज आपण मांडललेली मुद्दे बर्याच प्रमाणात एकांगी आहेत.म्हणून वस्तुस्थिती काही उदाहरणासह विनम्रपणे लक्षात आणून देतो
ReplyDelete35%समाजात महाराष्ट्रात आहे ग्रामीण भागात विखुरलेला आहे शेतीवर अवलंबून आहे हे सत्य असले तरी काळानुरुप शेतीचे तोट्यात जाणे हे त्याच्या अस्वस्थतेचे कारण आहेच ते नाकारत नाही पण ते अर्धसत्य आहे.शेतकर्यांची मुले उच्चशिक्षणात टीकू शकत नाही या मागे आर्थिक कारणं आहेत आणि याच्या मूळाशी आरक्षणही खदखद आहे.मी प्रत्येकवर्षी महाविद्यालयीन प्रवेशसमितीचा सदस्य असतो.शेतकर्याचा मुलगा येतो जात मराठा असते शेती चार एकर कोरडवाहू एम.एस्सीची शैक्षणीक शूल्क विचारतो 30,000/ आम्ही सांगतो...दुसर्या शेतकर्याचा मुलगा येतो शेती चार एकर कोरडवाहू जात विचारतो ओबीसी शिक्षण शुल्क फक्त 25रुपये..तिसरा अधिकार्याचा मुलगा येतो बाप सरकारी सेवेत महिनाकाठी लाखभर पगार जात एस्सी/एस्सटी शुल्क25/रुपये फक्त पुन्हा शिष्यवृत्ती 15.हजार
हे बघून मराठा पोरगा अस्वस्थ होतो आणि मग त्याला शेती सुधारणा,हमीभाव या पेक्षा आरक्षण महत्वाचे वाटू लागते.पिढ्यान् पिढ्या मराठी शेतीच करावे असे थोडे आहे त्याला ही शिक्षण,नोकरी महत्वाचे वाटते आहे..ओबीसीत अनेक जाती शेती करीत आहे.शेती म्हटले की सर्वांची परिस्थिती सारखीच परंतु मुलांबाळाच्या शिक्षणाचा भार तरी सरकार उचलते त्यामुळे एक बाजू सक्षम होत जाते.मेडीकल,इंजीनियर,आयआयटी च्या फीस पहा मग गरीब मराठा मुलांनी गुणवत्ता असली तरी शिकूच नये का? हा प्रश्न आहे।हा जसा प्रश्न आहे तसाच ऑट्रासिटीचा आहे तो कायदा जितका गरजेचा तितकाच दुरउपयोगाचा आहे।सर्रास ब्लॅकमेलिंगसाठी वापरला जात आहे.फिर्याद देणार्याला आर्थिक मदतीची सोय असल्या कारणाने काहीनी तर कामधंदेच सोडले आहेत एकच काम त्यांना आहे..
सुरेख लेख.. सुधाकर हा लेख किंवा याची छोटी आवृत्ती वर्तमानपत्रात आली पाहिजे ... महाराष्ट्र टाईम्स , उदाहरणार्थ
ReplyDeleteमिलिंद मुरुगकर
*शहाणे व्हा*
ReplyDeleteआरक्षणाबाबत मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत त्या लपून राहिलेल्या नाहीत. दलित नेत्यानिही त्याचे समर्थन केले कारण एक सामन्जस्य इथल्या भूमित नक्कीच आहे. पटेल आणि जाटाना जसे फसवले आणि आम्हाला नाही तर कुणालाच आरक्षण नाही अशी भूमिका घ्यायला लावली तशी मराठा समाजाने आणि मराठा नेत्यांनी कधीच घेतली नाही. उलट दिल्लीत कुर्मी समाज बैठकीत सर्व तथाकथित क्षत्रियाना शाहू महाराज सयाजीराव गायकवाड़ यांची भूमिका गळी उतरवुन हार्दिक पटेलच्या आंदोलनातील दोष दाखवले हे लक्षात घ्या. मराठा समाज नेहमीच दलितांसोबत राहिला आहे. गावकीच्या राजकारणात झळ बसल्याने दलित कार्यकर्ते संतापले. तोहि एक काळ येऊन गेला आणि दलिताना गाव सोडून शहरात या हा डॉ बाबासाहेबांचाहि एक काळ येऊन गेला. त्याचाच फायदा शहरी दलित समाजाच्या प्रगतित झाला पण यामुळे सर्व दलितांचे प्रश्न सुटले का? तीच बाब मराठ्यातील श्रीमंत नेते आणि मुठभर तालेवारांची आहे. डॉ आंबेडकरांची सुचना आपल्यासाठीही आहे असे समजून मराठे त्याचवेळी शहरात आले असते तर आज मातीत मिसळण्याची आणि तोट्यातील शेती करुन त्यांच्यावर आत्महत्या करायची वेळ आली नसती. हे वास्तव समजून घ्या. बापाकड़े लग्नासाठी आणि उच्च शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून मुलींनी आत्महत्या केल्या हेही वास्तव समजून घ्या. ज्या लोकांनी शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणून त्याला त्याच मातीत गाडले याचा राग वेगळ्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत आणि पिचलेल्या शेतकऱ्यांची मुले जर त्या लोकांच्या हाती लागायची नसतील तर दलित आणि ओबीसी नेत्यांनी स्वतः क्रांती मोर्चात उतरले पाहिजे. मराठा समाजानेही अभिमानाने त्याना निमंत्रित केले पाहिजे.
*आज मराठ्यांवर ट्रायल सुरु आहे उद्या ती धनगरांवर होणार आहे आणि परवा ती बुध्दिस्टांवर होणार आहे. बुध्दिस्ट विरुध्द इतर दलित जाती अशा वादाला खतपाणी घातले जात आहे किंवा नाही हे शोधा म्हणजे उद्याची ट्रायल कोणावर आहे ते ध्यानात येईल.* तेव्हा सर्वानी एकजुटिने रहावे. आज जे मराठे दलितांवर संशय घेतात आणि जे बुध्दिस्ट मराठयांवर संशय घेतात ते कोणाच्यातरी ट्रायलचे बळी आहेत हे समजून घ्या.
फक्त एकमेकांच्या पोरी आणि जावई केल्याने जाती अंत झाला असता तर आणिबाणी नंतरच जात संपली असती. ती आपल्या रक्तात खोलवर रूजली आहे तिला मान्य करुनच पुढे चालले पाहिजे. ते मान्य करून शाहू महाराजांनी प्रत्येक जातितल्या माणसाचे गुण हेरले. त्यापूर्वी ज्योतिबानी मुस्लिम आणि ब्राह्मणांचीही साथ मिळवली. बाबासाहेबांनीही सर्व जातीचे सहकारी मिळवले ही त्या महान माणसांची शिकवण आपण आपल्या जातीच्या अहंकारात विसरतो आणि घसरतो.
काही माणसाना त्यांच्या राजकीय हेतुसाठी महाराष्ट्रातील ही बहुजन एकजुट तोडायची आहे. (असे मी म्हणताच काहिना ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ आठवेल हां त्यांच्या वैचारिकतेचा दोष!)
आज कुठल्याही जातीना दुसऱ्याची वाट लावायला वेळ नाही काही ठराविक लोक आपला हेतु साध्य करण्यासाठी महार मराठा ब्राह्मण अशा जातितल्या मुलाना सोशल मिडियावर डिवचतात आणि ती शहरी पिलं दिवसभर राबुन रात्र आपल्या जातिसाठी मातीत घालतात. यातील बहुसंख्य आयटीत किंवा ऐटित नोकरी करत असतात. आपल्या भविष्या पेक्षा त्याना कुणीतरी जात आणि धर्माच्या भविष्यात गुरफटत असतो. आपण ही परिस्थिति बदलायला पुढे यावे असा विचार करायलाही या युवकांना या भांडनातुन फुरसत मिळत नाही इतके त्याना गुरफतून ठेवले जाते. असो
तर ही ट्रायल होत रहाणार मराठा क्रांती मोर्चात सर्व समाजानी सहभागी होऊन अशा लोकांना मराठी टिप्पिरा दिला पाहिजे *हरियाणा गुजरातेत जे सुरु आहे तशी जातीय मांडणी आमच्या महाराष्ट्रात होणार नाही हा वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे* हे दाखवून द्यायची वेळ आली आहे आपापल्या जातीतल्या पोराना भरकटण्यापासून वाचवायची हीच वेळ आहे सर्व जाती पंथानि हे समजून शहाणे व्हावे कोणाच्या प्रचाराचे बळी ठरू नये.
*शिवराज काटकर सांगली*
9325403226
Shivrajkatkar99@gmail.com
सत्य परिस्थिती
ReplyDelete